scorecardresearch

“फसवणूक करणाऱ्यांना अद्दल घडवणं खूप महत्त्वाचे…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

यानंतर तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्टही शेअर केली होती.

छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत छोटीशी भूमिका साकारलेल्या अभिनेत्री धनश्री भालेकरची फसवणूक झाल्याची गोष्ट काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यानंतर तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्टही शेअर केली होती. यानंतर आता मात्र फसवणूक झालेल्या या संपूर्ण प्रकरणातील पैसे तिने परत मिळाल्याचे सांगितले आहे.

धनश्रीने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने घडलेला संपूर्ण प्रकार आणि त्यानंतर तिला तिचे पैसे परत कसे मिळाले याबाबत सांगितले आहे. धनश्री म्हणाली, “मी या आधी काही व्हिडीओद्वारे माझ्यासोबत झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाबद्दल सांगितले होते. पण आज मला तुम्हाला सर्वांना सांगताना खूप आनंद होतोय की, त्या फसवणुकीच्या प्रकरणात माझे गेलेले सर्व पैसे मला परत मिळाले आहेत. यासाठी मी पोलिसांचे विशेष आभार मानते. ज्यांनी खूप छान तपास करुन मला माझे पैसे परत मिळवून देण्यात मदत केली. त्यासोबत चाहत्यांनी मला या काळात खूप आधार दिला. त्यासाठी धन्यवाद.”

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेने केले गुपचूप लग्न? व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागील सत्य समोर

“यानिमित्ताने मला तुम्हाला सांगायचे आहे की जर तुमची कोणी फसवणूक केली असेल तर त्याविरोधात आवाज उठवा. जेव्हा आपण त्याबद्दल आवाज उठवतो तेव्हा समाजात असणारी इतर लोक आपल्याला मदत करतात. पण आपण पहिलं पाऊल उचललं नाही तर हे शक्य होत नाही. त्यामुळे कृपया तुमच्याबरोबर अशी कोणतीही फसवणूक झाली असेल किंवा होत असेल तर तक्रार दाखल केला. त्यासोबत सर्वात आधी हे होऊ नये याची काळजी घ्या. पोलीस प्रशासन सर्वजण आपली मदत करतात.”

“जर आपण तक्रार दाखल केली नाही तर फसवणूक करणाऱ्यांचे तितकेच फावते. त्यामुळे यांना अद्दल घडवणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. आपल्या सर्वांना हेच वाटत की फसवणूक झाली की पैसे परत मिळत नाहीत. पण असे नसते. एखादी फसवणूक झाली तरी पैसे परत मिळतात. फक्त तुम्हाला पहिलं पाऊल उचलणे गरजेचे असते”, असेही ती म्हणाली.

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मधील अभिनेत्री धनश्री भालेकरची फसवणूक; सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

दरम्यान धनश्रीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओवर तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धनश्री भालेकर यांना एका वेब मालिकेत काम देतो असे सांगत त्यांच्याकडून २२ हजार ३६८ रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणी त्यांनी हा खुलासा केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Majhi tujhi reshimgath actress dhanashree bhalekar got my fraudulent money back share video nrp

ताज्या बातम्या