झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वायकुळ हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील नेहा आणि परीची केमिस्ट्री प्रेक्षकांना हवीहवीशी वाटत आहे. मालिका सध्या एका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत आता एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिले कि नेहाला देखील तिचे यशवर प्रेम असल्याचे जाणवते. पण तिने अजून ही गोष्ट कबूल केली नाहीये. आता मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एण्ट्री होणार आहे.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

जेसिका ही व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया निभावत आहे. समीर जेसिका ही यशची एक्स गलफ्रेंड असल्याचे नेहाला सांगतो. जेसिकाच्या एण्ट्रीमुळे मालिकेत विलक्षण वळण येणार आहे. नेहाला या जेसिकामुळे होणारी जेलसी समीर हेरतो, हीच गोष्ट यशला देखील कळेल का? यशसाठी असलेले प्रेम जेसिकाच्या येण्यामुळे नेहा व्यक्त करू शकेल का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.