scorecardresearch

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा ट्विस्ट, परी देणार यशला ‘बाबा’ म्हणून स्वीकारण्यास नकार

यशला ‘बाबा’ म्हणून स्वीकारण्यास परी स्पष्ट नकार देणार असल्याचे समोर आलं आहे.

छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेच्या लोकप्रियेतत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा म्हणजेच परी ही चिमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेत यश आणि नेहाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यशला ‘बाबा’ म्हणून स्वीकारण्यास परी स्पष्ट नकार देणार असल्याचे समोर आलं आहे.

नुकतंच या मालिकेचा एक प्रोमो झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोत परीला सांभाळणारे शेजारचे बंडू काका-काकू हे यश आणि नेहाच्या घरी गप्पा मारत असतात. त्याचवेळी बंडू काका हे परीला आता यश तिचा बाबा होणार असल्याचे सांगतो. त्यावेळी परी म्हणते, ‘कोण माझे बाबा?’ त्यावर बंडूकाका यशच्या दिशेने हात करतात आणि म्हणतात की, ‘आता परीने मस्ती केली की मी परीच्या बाबांना येऊन सांगणार.’

यावर परी म्हणते की, ‘हे माझे बाबा नाहीत. हा माझा फ्रेंड आहे. बाबा सोडून निघून जातात. त्यामुळे मला बाबा नकोय म्हणजे नकोय’, असं रागात सांगून तिथून निघून जाते. परीचे हे उत्तर ऐकून नेहा, यश आणि काका-काकू फारच चिंताग्रस्त होतात. त्यावेळी यश हा नेहाचा पडलेला चेहरा पाहत असतो.

नवाजुद्दीन सिद्दीकी करणार २७ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स, म्हणाली “कंगना मॅडमने….”

दरम्यान मालिकेत येणाऱ्या या नव्या ट्विस्टमुळे यश आणि नेहाच्या नात्यात पुन्हा खोडा पडणार का? परी यशचा बाबा म्हणून स्वीकार करेल का? त्यांना त्यांच्या प्रेमाचा बळी द्यावा लागेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. या टीझरमुळे आता ही मालिका काय वळण घेणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Majhi tujhi reshimgath serial new twist pari clearly refuse to accept yash as baba nrp

ताज्या बातम्या