scorecardresearch

Premium

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारीत ‘Major’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित!

अभिनेत्री सई मांजरेकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

major movie, 26/11 terrorist attack,
अभिनेत्री सई मांजरेकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आता पर्यंत आपण भारतीय सेनेवर आधारीत अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्यात आता आणखी एक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ (Major) चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

२६/११ चे भीषण चित्र आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणापासून ते मेजर बनण्यापर्यंत आणि मुंबई दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचा सामना करण्यापर्यंतची झलक पाहायला मिळते.

आणखी वाचा : “थोडी तरी लाज बाळग…”, मुलगी आयरा खानच्या ‘त्या’ फोटोवरून आमिर खान झाला ट्रोल

आणखी वाचा : सोनाक्षी सिन्हाने केला साखरपुडा? पोस्ट शेअर करत म्हणाली…

मेजर संदीप उन्नीकृष्णनची भूमिका अभिनेता आदिवी शेषने (Adivi Sesh) केली आहे. ज्याद्वारे मेजर संदीप यांच्या पराक्रमाची गाथा चित्रित करण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की मेजर संदीप यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीची भावना होती आणि त्यांना नेहमी सैन्यात भरती व्हायचे होते. चित्रपटात केवळ मेजर यांचे देशावर असलेले प्रेम आणि तळमळ नाही तर एका सैनिकाचे वैयक्तिक आयुष्यही दाखवण्यात आले आहे. एक सैनिक मुलगा, पती असूनही आपल्या देशाला कसे वरचेवर ठेवतो. आपला जीव गमवावा लागेल, तो कधीच परत येणार नाही, हे माहीत असतानाही आपल्या देशाचे शूर संदीप मेजर उन्नीकृष्णन यांनी केवळ लोकांच्या जीवाची काळजी घेतली होती.

आणखी वाचा : चित्रपटात मेकअप न करण्याऱ्या ‘या’ अभिनेत्रीने धुडकावले चक्क २ कोटींचे मानधन

आणखी वाचा : आपल्या कर्माने श्रीमंत होतात ‘या’ ३ राशीचे लोक, शनिदेवाची त्यांच्यावर असते विशेष कृपा

दरम्यान, या चित्रपटात आदिव शेषासोबत शोभिता धूलिपाला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती एका प्रवासी भारतीय महिलेची भूमिका साकरली असून ती त्या रात्री दहशतवाद्यांच्या या भयानक हल्ल्यात हॉटेलमध्ये बळी पडते. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज या चित्रपटात मेजर संदीपच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर (Saiee Manjrekar) मेजर संदीप यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट ३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Major movie trailer out film major based on major sandeep unnikrishnan who martyred in 26 11 mumbai terrorist attack watch video dcp

First published on: 09-05-2022 at 19:31 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×