makes of liger and actor vijay deverkonda questioned by Enforcement Directorate agency in Hyderabad today spg 93 | विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; 'या' चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी | Loksatta

विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी

ईडी या चित्रपटासंदर्भातील इतर चौकशी करत आहे

विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार मानला जाणारा विजय देवराकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा अर्जुन रेड्डी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. नुकताच त्याचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला मात्र प्रेक्षकांमधील त्याची लोकप्रियता अद्याप कायम आहे. आता याच चित्रपटासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वी विजयचा ‘लायगर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासून चर्चेत होता. मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई हा करू शकला नाही. आता या चित्रपटासंदर्भात ईडीला काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. परकीय चलनात उल्लंघन केल्याप्रकरणी विजय देवराकोंडा आज हैदराबाद येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला होता.

“कोणाची हिंमत…” मलायकाच्या गरोदरपणावर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर संतापला

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांना याआधीच ईडीने समन्स बजावले होते. ‘लायगर’ चित्रपटाच्या निर्मितीमध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना बोलवण्यात आले होते. ईडीला असा संशय आहे की या चित्रपटात बेकायदेशीर गुंतवणूक केली गेली आहे. आता ईडी या चित्रपटासंदर्भातील इतर चौकशी करत आहे. ANI ने ट्वीट करत ही माहिती दिली.

१२० कोटी रुपयांचं बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ४० कोटी रुपयांच्या आसपासच गल्ला जमवू शकला. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे पदार्पण अयशस्वी ठरलं. विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे या कलाकारांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत. विजयसह अनन्या देखील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभरात फिरली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 20:04 IST
Next Story
“माझं हृदय फक्त तुझ्यासाठी…” क्रिती सेनॉनच्या पोस्टची जोरदार चर्चा