मलायका- अमृताची मनिष मल्होत्राच्या घरी पार्टी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

मनिष मल्होत्राच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मलाकाला- अमृताला ट्रोल केलं जात आहे.

malaika arora, amrita arora, manish malhotra, karan johar, malaika arora troll, मलायका अरोरा, अमृता अरोरा, करण जोहर, मनिष मल्होत्रा, मलायका अरोरा ट्रोल
करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना अलिकडेच करोनाची लागण झाली होती.

अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आताही असंच काहीसं झालंय. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी झालेल्या एका पार्टीचे फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा मलायका अरोराच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. या फोटोंमध्ये मलायका अरोरा, अमृता अरोरा, करण जोहर, करिना कपूर, मनिष मल्होत्रा एन्जॉय करताना दिसत आहेत. पण या फोटोंमुळे आता मलायका आणि अमृता यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

मनिष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्रामवर या पार्टीचे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘मित्रांसोबत एक दुपार’ मनिषनं त्याच्या या पोस्टमध्ये मलायका, करिना, अमृता आणि करणला टॅग केलं आहे. याशिवाय त्यानं करिश्मा कपूरसाठी, ‘तुझी आठवण आली’ असं लिहिलं आहे. हेच फोटो करिना कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी अमृता अरोराला तिच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोल करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे काहींनी करण जोहरच्या कपड्यांवरून त्याच्यावर टीका केली आहे. एवढंच नाही तर एका युजरनं करोनावरूनही या सर्वांना ट्रोल केलं आहे. या युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘पुन्हा एकदा हे सगळेजण एकत्र आले. आत्ताच करोनाच्या संक्रमणातून ठीक झालेले आहात.’

दरम्यान याआधी करिना कपूर आणि तिच्या गर्ल्स गँगनं करण जोहरच्या घरी काही दिवसांपूर्वीच पार्टी केली होती. ज्यानंतर करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना करोनाची लागण झाली होती. याशिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरही काही लोकांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे आता या सर्वांना पुन्हा एकदा पार्टी केल्यानं करोनावरून ट्रोल केलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaika arora and amrita arora got trolled for doing party at manish malhotras house mrj

Next Story
ब्रा साईज आणि देवावरून वक्तव्य करणाऱ्या श्वेता तिवारीवर कारवाई होणार?
फोटो गॅलरी