मलायका- अर्जुन निघाले रोमँटीक व्हेकेशनवर, युजर्स म्हणाले “आता लग्नाची…”

अर्जुन कपूर वाढदिवसाआधी मलायकासोबत व्हेकेशनसाठी रवाना झाला आहे.

malaika arora, arjun kapoor, malaika arora video, malaika arora boyfriend, arjun kapoor girlfriend, malaika arjun vacation, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, मलायका अरोरा व्हिडीओ, मलायका अर्जुन व्हेकेशन, अर्जुन कपूर बर्थडे, मलायका अरोरा बॉयफ्रेंड
मलायका आणि अर्जुन रोमँटीक व्हेकेशनसाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर स्पॉट झाले.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानले जातात. सोशल मीडिया किंवा बॉलिवूड पार्टी दोघंही एकमेकांवरील प्रेम बिनधास्त व्यक्त करताना दिसतात. तसेच दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो देखील शेअर करताना दिसतात. अर्जुन कपूर २६ जूनला ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याआधी मलायका आणि अर्जुन रोमँटीक व्हेकेशनसाठी रवाना होत असताना मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर खूपच स्टायलिश अंदाजात मुंबई विमानतळावर दिसले. त्यानंतर अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त दोघंही पॅरीसला रोमँटीक व्हेकेशनसाठी गेल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. मात्र याबाबत या दोघांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. मलायका आणि अर्जुनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘आनंदी राहण्याचा हक्क सर्वांना आहे. जर ते दोघं एकमेकांसोबत आनंदी आहेत तर ती त्यांची निवड आहे.’ तर आणखी एका युजरनं या दोघांना ‘लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारला आहे.

अर्जुन आणि मलायकाच्या नात्याबद्दल बोलायचं तर ३ वर्षांपूर्वी या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. मलायकानं अर्जुनसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं होतं. मागच्या काही काळापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत. यावर अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं प्रतिक्रिया दिली होती. ‘आम्ही आयुष्याच्या अशा वळणावर उभे आहोत जिथे पुढे काय करायचं आहे यावर आम्ही विचार करत आहोत.’

अर्जुन कपूर बद्दल बोलायचं तर येत्या २६ जूनला तो ३७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्जुननं त्याच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘इश्कजादे’ या चित्रपटातून केली होती. मागच्या १० वर्षांपासून अर्जुन बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. लवकरच तो ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय आगामी काळात त्याच्याकडे ‘कुत्ते’ आणि ‘द लेडी किलर’ हे चित्रपट आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaika arora and arjun kapoor went for romantic vacation video goes viral mrj

Next Story
वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर
फोटो गॅलरी