आज १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. अनेकजण त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या प्रेमामी कबुली दिली आहे. काहींनी याच दिवशी लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. व्हॅलेंटाइन डे साजरा करताना बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने मलायकाच्या या पोस्टवर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मलायकाने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘तू माझा आहेस’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान मलायकाने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केल्याचे दिसत आहे. तर अर्जुनने रंगाचं टी-शर्ट आणि राखाडी रंगाची ट्रॅक पँट घातली आहे.

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
a young man perform on damlelya babachi kahani song
Viral Video : लग्नात तरुणाने सांगितली ‘दमलेल्या बाबाची गोष्ट’, बाप लेकीला अश्रू अनावर; पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान अभिनेत्री ट्विंकल खन्नाने देखील त्यांच्या या फोटोवर कमेंट केली आहे. तिने ‘Awww’ असे म्हणत हार्ट इमोजी वापरले आहेत.

मलायका आणि अर्जुन गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांना बऱ्याच वेळा त्यांच्या नात्यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. पण ते दोघेही याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तर मलायकाने २०१७ मध्ये अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिला. अरबाज आणि मलायकाला एक मुलगा असून अरहान खान असे त्याचे नाव आहे.