अर्जुनसोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याविषयी मलायका म्हणते…

अरबाजपासून विभक्त होण्यापूर्वी अनेकांनी मला घटस्फोट न घेण्याचा सल्ला दिला होता.

अर्जुन कपूर, मलायका अरोरा

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांना डेट करत असल्याचं आता जगजाहीर झालं आहे. या दोघांनाही अनेक वेळा एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाने तिला अर्जुन आवडत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर मलायका आणि अर्जुन लवकरच ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चेवर मलायकाने तिचं मौन सोडलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिने अर्जुनसोबत लग्न करण्याविषयी तिचं मत मांडलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चांना मलायकाने फेटाळून लावलं आहे. मी आणि अर्जुन ख्रिश्चन पद्धतीने वैगरे लग्न करणार नाही, असं तिने जाहीरपणे सांगितलं आहे.

“अर्जुन आणि माझ्या लग्नाविषयी केवळ प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा रंगत आहेत. मुळात मी त्याच्यासोबत लग्नच करणार नाहीये. त्यामुळे ख्रिश्चन पद्धतीने लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही”, असं मलायका म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, “अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मला एकाकी आयुष्य जगायचं नव्हतं. प्रत्येकाला आयुष्याच्या वळणावर जोडीदाराची साथ हवी असते. अरबाज आणि मी विभक्त होण्यापूर्वी अनेकांनी मला घटस्फोट न घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होते”.

मलायकाने केलेल्या या वक्तव्यांवरुन तिने पुन्हा एकदा अर्जुनला डेट करत असल्याचं कबूल केलं आहे. त्यासोबतच लग्नाच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलंही आहे. दरम्यान, अरबाज-मलायका या दोघांनी गेल्या वर्षी घटस्फोट घेतला. त्यानंतर अरबाने प्रेयसी जॉर्जिया एण्ड्रीयानीसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Malaika arora finally reacts to the much reported church marriage with alleged boyfriend arjun kapoor