अरबाज खानने मलायका अरोराला पाठवले खास गिफ्ट, जाणून घ्या कारण

पाहा व्हिडीओ

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेच असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. पुन्हा एकदा मलायकाने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये पुर्वाश्रमाचा पती अरबाज खानने तिला ते गिफ्ट दिल्याच मलायकाने सांगितले आहे.

मलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंबे दिसत आहेत. हे आंबे मलायकाला अरबाजने पाठवले आहेत. “आंबे पाठवण्यासाठी धन्यवाद अरबाज” अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने त्या व्हिडीओला दिले आहे. आता मलायका आणि अर्जुन हे रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांना एकत्र पाहून त्यांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर अरबाजने हे केले नाही ना? असे प्रश्न अनेकांच्या समोर आले आहेत.

मलायका आणि अरबाज यांनी १९९८ मध्ये लग्न केलं. त्यानंतर २०१७ मध्ये ते विभक्त झाले. या दोघांनी एक मुलगा असून त्याचे नाव अरहान आहे. विभक्त झाल्यानंतर हे दोघे ही आयुष्यात पुढे निघाले आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे दोघे बराच वेळा एकत्र दिसतात. तर दुसरीकडे अरबाज हा इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Malaika arora get special gift from arbaaz khan video going viral dcp

ताज्या बातम्या