scorecardresearch

“टॉप घालायला विसरली…” करण जोहरच्या पार्टीतील लुकमुळे मलायका अरोरा ट्रोल

करण जोहरच्या बर्थ डे पार्टीसाठी घातलेल्या ड्रेसमुळे मलायका ट्रोल होत आहे.

malaika arora, malaika arora outfits, malaika arora troll, karan johar birthday, karan johar birthday party, मलायका अरोरा, करण जोहर, मलायका अरोरा ट्रोल, करण जोहर वाढदिवस, करण जोहर बर्थ डे पार्टी, मलायका अरोरा लुक
फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असणारी मलायका अरोरा आघाडीच्या अभिनेत्रींना ड्रेसिंगच्या बाबतीत टक्कर देते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ओळखली जाते. तिच्या ड्रेसिंगमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असणारी मलायका अरोरा आघाडीच्या अभिनेत्रींना ड्रेसिंगच्या बाबतीत टक्कर देते. नुकतीच मलायकानं दिग्दर्शक निर्माता करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली. यावेळच्या तिच्या लुकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर या लुकमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

करण जोहरच्या बर्थडे पार्टीसाठी बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येजण एका पेक्षा एक ग्लॅमरस लुकमध्ये पाहायला मिळाला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती मलायका अरोराच्या लुकचीच. मलायका बोल्ड अंदाजात करण जोहरच्या पार्टीला पोहोचली होती. यावेळी ती नियॉन ग्रीन कलरचं ब्लेझर आणि शॉर्ट्समध्ये दिसली. हा लुक तिने रिव्हिलिंग ब्रालेटसोबत पूर्ण केला होता. या लुकमध्ये मलायका खूपच हॉट दिसत होती.

आणखी वाचा- मृणाल दुसानीसने शेअर केली लेकीची पहिली झलक, Video पाहिलात का?

मलायका अरोराचा हा लुक देखील नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल झाला. एकीकड तिच्या या लुकचं सोशल मीडियावर कौतुक होत असलं तरी दुसरीकडे मात्र तिचा अशाप्रकारचा बोल्ड लुक काही युजर्सच्या अजिबात पसंतीस पडलेला नाही आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरनं कमेंट करताना लिहिलं, ‘ती टॉप घालायला विसरली आहे’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘कपड्यांचं सर्वात वाईट सिलेक्शन.’ अशा प्रकारच्या कमेंट करत अनेकांनी मलायकावर टीका केली आहे.

दरम्यान मलायका अरोरा अशाप्रकारे ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा रिव्हिलिंग कपड्यांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे. याशिवाय मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होते. मागच्या काही वर्षांपासून मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघांच्या वयात बराचं मोठा फरक असल्याने त्यांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaika arora got troll for wearing revealing outfits on karan johar birthday party mrj

ताज्या बातम्या