scorecardresearch

आता कशी आहे अपघातात जखमी झालेल्या मलायकाची प्रकृती? बहीण अमृतानं दिली माहिती

अपघातानंतर मलायका अरोराच्या प्रकृतीविषयी बहीण अमृता अरोरानं माहिती दिली आहे.

malaika arora, malaika arora accident, malaika arora sister, amrita arora, malaika arora health update, मलायका अरोरा, अमृता अरोरा, मलायका अरोरा अपघात, मलायका अरोरा हेल्थ अपडेट
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला शनिवार २ एप्रिल रोजी 'खोपोली एक्सप्रेस वे'वर अपघात झाला.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला शनिवार २ एप्रिल रोजी ‘खोपोली एक्सप्रेस वे’वर अपघात झाला. पुण्यातील एका फॅशन इव्हेंटसाठी जात असताना मलायकासोबत ही दुर्घटना घडली. तीन गाड्याच्या झालेल्या या अपघातात मलायकाला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे. या अपघातानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आता तिची बहीण अमृता अरोरानं मलायकाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

मलायकाच्या कारला झालेल्या अपघाताची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिचे चाहते चिंतेत होते. मलायकाची प्रकृती आता कशी आहे याबाबत चाहत्यांना काळजी लागून राहिली होती. पण आता मलायकाची बहीण अमृतानं तिच्या प्रकृतीबाबत माहिती देत काळजीचं काहीच कारण नसल्याचं सांगितलं आहे. मलायकाची प्रकृती आता पहिल्यापेक्षा उत्तम असल्याचंही तिने म्हटलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना अमृता अरोरा म्हणाली, ‘मलायका आता ठीक होत आहे. काही काळासाठी तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.’ याशिवाय अपोलो हॉस्पिटलनं मलायकाचे हेल्थ अपडेट दिले होते. ज्यात त्यांनी सांगितलं होतं की, ‘मलायकाच्या डोक्याला किरकोळ स्वरुपाच्या जखमा आहेत. सीटीस्कॅनमध्येही कोणतीही गंभीर दुखापत आढळून आलेली नसून अभिनेत्री सध्या ठीक आहे.’

आणखी वाचा- कंगनाला आपल्या चित्रपटासाठी साइन करण्यास विवेक अग्निहोत्रींचा स्पष्ट नकार, म्हणाले…

दरम्यान जेव्हा हा अपघात झाला त्यावेळी मलायका आपल्या रेंज रोवरमधून प्रवास करत होती. तिची कार दोन अन्य गाड्यांच्या मध्ये अडकली आणि अपघात झाला. खोपोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर म्हणाले, ‘आम्हाला तीनही गाड्यांचे रजिस्टर नंबर मिळालेले आहेत. आता हा अपघात कसा झाला हे जाणून घेण्यासाठी आम्ही तीनही गाड्याच्या मालकांशी संपर्क करणार आहोत. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.’

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaika arora health update sister amrita arora talk about accident and other details mrj

ताज्या बातम्या