बॉलिवूडमध्ये सध्याचे सर्वांचे लाडके कपल म्हणून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ओळखले जातात. ते अनेकदा बाहेर एकत्र फिरताना, पार्टीला जाताना दिसतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन हा मलायकापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाच्या फरकामुळे अनेकदा त्यांना ट्रोल करण्यात येते. नुकतंच एका मुलाखतीत मलायकाने या ट्रोलिंगवर स्पष्टपणे उत्तर दिले आहे.
मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. त्या दोघांना वयाचा फार मोठा फरक आहे. या फरकामुळे अनेकदा ट्रोल करण्यात येते. नुकतंच मलायकाने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
ब्रेकअपच्या अफवांवर अर्जुन कपूरने मौन सोडल्यानंतर मलायका अरोरा म्हणाली…
यावर बोलताना मलायका म्हणाली, “ब्रेकअप किंवा घटस्फोटानंतर एखाद्या महिलेला आयुष्य जगण्यासाठी कारण मिळणे खूप गरजेचे असते. अनेकदा स्त्रियांच्या संबंधाबाबत अतिशय वाईट दृष्टीकोन ठेवला जातो. जर एखाद्या महिलेने आपल्यापेक्षा लहान मुलाला डेट केले तर तो चर्चेचा मुद्दा ठरतो.”
“मी नेहमी माझ्या आईचा सल्ला मानते. मी माझ्या आईची सावली आहे. तिच्या सल्ल्याने आणि विचारधारेने मी आयुष्यात पुढे जात आहे. ती नेहमी मला माझ्या अटींवर स्वतंत्रपणे जगण्याचा सल्ला देते”, असेही ती म्हणाली.
“मला वेळ द्या…”, अर्जुन कपूर आणि मलायकाच्या लग्नावर अरबाज खानने सोडले मौन
याआधीही एका मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबत तिच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले होते. “माझ्याबद्दल कोण काय बोलते, याची मला अजिबात पर्वा नाही. जर एखादी महिला आपल्यापेक्षा लहान पुरुषाला डेट करत असेल तर तिला अतिउत्साही किंवा म्हातारी असे म्हटले जाते. पण जेव्हा एखादा पुरुष कमी वयाच्या तरुण मुलीला डेट करत असेल तर ती अभिमानास्पद बाब मानली जाते”, असा टोला तिने लगावला होता.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाला, त्यानंतर ते दोघंही वेगळे झाले होते. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येत्या एप्रिल महिन्यात ते दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.