scorecardresearch

‘तू नीट कपडे घालायला शिक’, ट्रॅफिक पोलिसासोबत जीमच्या कपड्यांमध्ये फोटो काढल्याने मलायका झाली ट्रोल

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

malaika arora got trolled
मलायका पुन्हा एकदा जीमच्या कपड्यांमुळे झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटसृष्टीपासून लांब असली, तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. मलायका तिच्या बोल्ड फोटोंसोबत तिच्या फीटनेसमुळे ही चर्चेत असते. मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मलायकाने एका ट्रॅफिक पोलिसासोबत जीमच्या कपड्यांमध्ये फोटो काढल्याने ती ट्रोल झाली आहे.

मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका जीमला जाण्यासाठी तिच्या सोसायटीच्या बाहेर पडताना दिसत आहे. मलायकाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. मलायका सोसायटीतून बाहेर येताना फोटोग्राफर्सने तिला फोटो काढण्यासाठी थांबवले. तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसाने येऊन मलायका सोबत फोटो काढायचा असल्याचे सांगितले. मलायकाने त्या ट्रॅफिक पोलिसासोबत जीमच्या कपड्यांमध्ये फोटो काढल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

malaika arora got trolled
मलायका पुन्हा एकदा जीमच्या कपड्यांमुळे झाली ट्रोल

 

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘कृपया, तिला काही कपडे द्या.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जीम मध्ये असं कोण जातं?’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘तू आधी कपडे कसे घालायचे ते शिक.’ मलायका पहिल्यांदा ट्रोल झाली नाही. या आधीही बऱ्याचवेळा मलायका ट्रोल झाली आहे. मलायका ४७ वर्षांची असली तरी तिचा फीटनेस हा एका तरुणीसारखा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-07-2021 at 18:18 IST

संबंधित बातम्या