scorecardresearch

एखाद्या स्त्रीला नेहमी तिच्या स्कर्टची लांबी अन्…, सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायका अरोराने दिले सडेतोड उत्तर

मात्र नुकतंच मलायकाने या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.

बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणून मलायका अरोराला ओळखले जाते. मलायका सध्या सिनेसृष्टीपासून लांब असली तरी ती सतत चर्चेत असते. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप असो किंवा तिने परिधान केलेले ड्रेस, तिची चालण्याची स्टाईल यामुळे अनेकदा तिला ट्रोल केले जाते. मात्र नुकतंच मलायकाने या ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.

मलायकाने नुकतंच ‘बॉलिवूड बबल’ या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ड्रेसिंगवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, “महिलांच्या नेकलाइन आणि हेमलाइन्सवर नेहमीच टीका केली जाते. एखादी ड्रेसिंग करणे ही माझी वैयक्तिक निवड आहे. मी काय परिधान करावे हे इतरांनी सांगण्यापेक्षा लोकांनी त्यांचे स्वतःचे जीवन जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे.”

“मी मूर्ख नाही. माझ्यावर काय चांगले दिसते हे मला माहित आहे. जर मी काहीही परिधान करत असेल आणि मला त्यात आरामदायी वाटत असेल तर इतरांनाही ते स्वीकारले पाहिजे. एखाद्या स्त्रीला नेहमी तिच्या स्कर्टची लांबी किंवा तिच्या नेकलाइनवरुन बोलले जाते. लोक माझ्या हेमलाइन किंवा नेकलाइनबद्दल काय बोलतात, त्यानुसार मी माझे आयुष्य जगू शकत नाही,” असे मलायका म्हणाली.

“ड्रेसिंग ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल एका विशिष्ट प्रकारे नक्की विचार करू शकता. पण तो विचार माझ्यासाठी नसेल. ती माझी वैयक्तिक निवड आहे. इतरांची निवड नाही. मी कोणाच्याही कपड्यांबाबत हा निर्णय घेऊ शकत नाही. तसेच तू असे कपडे का घालतोस? असा प्रश्नही त्याला विचारु शकत नाही, असेही तिने सांगितले.

यापुढे मलायका म्हणाली की ‘जर मला या कपड्यात आरामदायक वाटत असेल तर… मी मूर्ख नाही. मला माहित आहे की मला काय चांगले दिसते, काय नाही. ती माझी निवड आहे आणि मला ते सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी माझी त्वचा, माझे शरीर आणि माझे वय याचा योग्य तो विचार मी करते. त्यामुळे ते तुम्हालाही स्विकारावे लागतील.

“पोलिसांनी तातडीने मदत पाठवली म्हणून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकाराला लुटण्याचा प्रयत्न, फेसबुक पोस्टद्वारे सांगितला थरारक अनुभव

मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात व्हीजे म्हणून केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच अनेक आयटम साँगमध्येही ती झळकली. सध्या मलायकाही टेलिव्हिजन क्षेत्रात सक्रीय आहे. ती सध्या अनेक रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaika arora reacts on being judged for the way she dresses says i am not silly or stupid nrp

ताज्या बातम्या