बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरुक असलेली मलायका नेहमीच तिचे जिममधील फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. याशिवाय तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीदेखील अनेकदा चर्चेत असतात. पण सध्या मलायका तिच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर बेडरुममधील एक फोटो शेअर केला होता. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

मलायका अरोरा मागच्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. मलायकानं शेअर केलेला हा फोटो सध्या बराच चर्चेत आहे. या फोटोमधील एका खास वस्तूनं मलायकाच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक

आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

मलायकानं शेअर केलेला हा फोटोमध्ये तिच्या बेडरुममधील आहे आणि त्यामध्ये एक फोटो फ्रेम दिसत आहे. या फोटो फ्रेममध्ये मलायका आणि अर्जुन यांचा एक रोमँटिक फोटो आहे. या फोटोमध्ये असलेल्या फ्रेमनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोवरून मलायकाचं अर्जुनवर किती प्रेम आहे हे लक्षात येतं. काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू होत्या मात्र नंतर यावर दोघांनीही स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याचं म्हटलं होतं.

आणखी वाचा- Video : ‘सासरे मागे बसलेत आणि सून…’ डान्स व्हिडीओमुळे ट्रोल झाली अंकिता लोखंडे

दरम्यान मलायका चित्रपटसृष्टीत सक्रीय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा १९ वर्षांचा झाल्यानंतर तिने अरबाज खान पासून घटस्फोट घेतला होता. १९९८ साली या दोघांनी लग्न केलं होतं आणि २०१७ साली ते दोघेही वेगळे झाले. त्यानंतर मलायका आणि अरबाज या दोघांनीही करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. सध्या मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही सिनेसृष्टीत सुरु आहेत.