मलायका अरोराच्या आईला पाहिलेत का?

मदर्स डे निमित्त मलायकाने आईसोबत फोटो शेअर केला आहे.

मलाइका अरोरा फोटो सौजन्य- इंस्टाग्राम

आज १० मे रोजी ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहत साजरा केला जात आहे. आईची महती किंवा प्रेम हे शब्दात व्यक्त करता येत नाही असे बऱ्याच वेळा म्हटले जाते. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मदर्स डे’ मोठा उत्साहत साजरा केला जातो. प्रत्येकजण जमेल त्या पद्धतीने आईवरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये सेलिब्रिटीही मागे नाहीत. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आईसोबत फोटो शेअर करत खास संदेश लिहित आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचाही समावेश आहे.

मलायकाने आई जॉइस पालीकार्पसोबत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने बिकीनी परिधान केली असून दोघीही फोटोमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहेत. तर जॉइस या सेल्फी घेताना दिसत आहेत.

हा फोटो शेअर करत मलायकाने छान असे कॅप्शन दिले आहेत. ‘जेव्हा आपण बी पेरतो तेव्हा त्याचे मोठ्या झाडामध्ये रुपांतर होण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. त्याला वाढवण्यासाठी पाणी, हवा आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. आपल्याला हे सगळं केवळ आपली आईच देऊ शकते. ती आपल्यासाठी सर्वकाही असते’ असे तिने कॅप्शनमध्ये लिहित आईला ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Malaika arora shared her mother joyce polycarp photo on mothers day avb

ताज्या बातम्या