लग्नाच्या १८ वर्षांनंतर मलायका-अरबाजने घेतला होता घटस्फोट, अशी होती मुलाची प्रतिक्रिया

मलायकाने एका चॅट शोमध्ये मुलाची प्रतिक्रिया कशी होती हे सांगितले आहे.

malaika arora, ahan khan,

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्नाच्या १८ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्या दोघांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यावेळी सर्वांना पडला होता. आज ९ नोव्हेंबर रोजी अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहानचा वाढदिवस आहे. अरहान त्याचा १९वा वाढदिवस परदेशात साजरा करत आहे. अरहानच्या प्रत्येक वाढदिवशी अरबाज आणि मलायका एकत्र येतात. पण यंदा अरहान परदेशात असल्यामुळे ते शक्य झाले नाही.

मलायका आणि अरबाज बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल होते. त्यांनी लग्नाच्या जवळपास १८ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयानंतर कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती हे मलायकाने करीना कपूरच्या चॅट शोमध्ये सांगितली होती. त्यावेळी तिने तिच्या मुलाची प्रतिक्रिया देखील सांगितली होती.
आणखी वाचा : आर्यन प्रकरणानंतर विमानतळावर फोटोग्राफर्सपासून लपण्यासाठी शाहरुखने वापरली ही क्लुप्ती?

‘अरहानने माझ्या आणि अरबाजचा निर्णय स्वीकारला आहे. मला माझ्या मुलांना चांगल्या वातावरणात मोठं होताना पाहायचे आहे. माझ्या आणि अरबाजच्या घटस्फोटाच्या काही दिवसांनंतर अरहान माझ्याकडे आला आणि मला आनंदी पाहून त्याला खूप बरं वाटले होते असे तो येऊन म्हणाला’ असा खुलासा मलायकाने केला होता.

आई-वडिलांच्या घटस्फोटावर अरहानची अशी प्रतिक्रिया होती असे मलायकाने सांगितले होते. अरबाज पासून विभक्त झाल्यावर मलायका आनंदी होती. तिने कधीही मुलाला वडिलांना भेटण्यापासून थांबवले नाही. आजही अरहान वडिलांसोबत वेळ घालवताना दिसतो.

अरहान सध्या शिक्षणासाठी परदेशात गेला आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवशी मलायका आणि अरबाज जाऊ शकले नाहीत. मलायकाने मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याची आठवण येत असल्याचे म्हटले होते. तर अरबाजने मुलासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अरहान लहान असल्याचे दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Malaika arora son arhaan khan reaction on divorce his parents divorce avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या