बॉलिवूडमधील अतिशय हॉट अभिनेत्रींच्या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. वयाच्या ४८व्या वर्षी देखील मलायकाचा जलवा कायम आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण सध्या सोशल मीडियावर मलायकाला ट्रोल केले जात आहे.

मलायका तिच्या पाळीव श्वानाला घेऊन नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने राखाडी रंगाची ट्रॅक पँट आणि जॅकेट घातले होते. तसेच तोंडाला डबल मास्क देखील लावले होते. दरम्यान मलायकाने ब्रा न घातल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी तिला सुनावले आहे तर काहींनी तिला पाठिंबा दिला आहे.
आणखी वाचा : ब्रेस्ट सर्जरीसाठी मिया खलिफाने खर्च केले इतके पैसे, आकडा वाचून बसेल धक्का

एका यूजरने ‘तुला ब्रा घालायला काय समस्या आहे?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘ही किती निर्लज्ज बाई आहे…’ असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने तिला ब्रा न घातल्यामुळे सुनावले आहे. तर दुसरीकडे काही यूजरने ब्रा घालायची की नाही ही तिची अतिशय व्यक्तिगत बाब आहे असे म्हणत मलायकाला पाठिंबा दिला आहे. पण सोशल मीडियावर सध्या मलायकाचे हे फोटो व्हायरल झाले असून चर्चेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अर्जुनने मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच मलायकाने देखील त्यावर कमेंट करत हार्ट इमोजी वापरले.