Fahadh Faasil Debut In Bollywood : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार आता बॉलीवूडमध्ये जबरदस्त काम करताना पाहायला मिळत आहेत. विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया, समांथा प्रभू हे कलाकार सध्या बॉलीवूडमध्ये अधिक सक्रिय झाले आहेत. आता यामध्ये आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. मल्याळम इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता फहाद फासिल बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे.

‘आवेशम’ फेम फहाद फासिल ( Fahadh Faasil ) लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. माहितीनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली त्यांच्या पुढील प्रोजेक्टसाठी फहाद फासिलला विचारलं आहे. या प्रोजेक्टमध्ये फहादबरोबर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात झळकलेली ‘जोया भाभी’ म्हणजेच तृप्ती डिमरी झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

First photo of saif ali khan attacker
PHOTO: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
kareena kapoor at lilavati hospital video viral
सैफ अली खानला भेटायला पोलिसांबरोबर रुग्णालयात पोहोचली करीना कपूर खान, Video Viral
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan attacked by intruder at bandra home
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, वांद्रेतील घरात मध्यरात्री घडली घटना
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…

हेही वाचा – Bigg Boss 18: शोमध्ये येण्याआधी शिल्पाचं बहीण नम्रता शिरोडकरशी झालं होतं भांडण, भावुक होत अनुराग कश्यपला म्हणाली, “दोन आठवडे…”

‘पीपिंग मून’च्या वृत्तानुसार, इम्तियाज अली आगामी प्रोजेक्ट फक्त दिग्दर्शित करणार नसून निर्मितीची धुरादेखील सांभाळणार आहेत. यामध्ये तृप्ती डिमरी फहादची हिरोइन असणार आहे. माहितीनुसार, फहाद फासिल ( Fahadh Faasil ) इम्तियाज अली यांच्या प्रोजेक्टमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप उत्सुक आहे. फहादचे बॉलीवूडमधील आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक इम्तियाज आहेत.

हेही वाचा – नागा चैतन्य-सोभिता धुलीपाला ६५० कोटींच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये करणार लग्न, सुपरस्टार्स लावणार कुटुंबासह खास हजेरी, गेस्ट लिस्ट आली समोर

गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली त्यांच्या या आगामी प्रोजेक्टविषयी चर्चा करत आहे. तसंच प्रोजेक्टबाबत काही करारदेखील झाले आहेत. शिवाय प्रोजेक्टच्या कथेला फायनल टच दिला जात आहे. प्रोडक्शन काम जानेवारीच्या मध्यावर सुरू होणार आहे.

हेही वाचा – श्रद्धा कपूरने जुहूमध्ये भाड्याने घेतलं आलिशान अपार्टमेंट, महिन्याला एक-दोन नव्हे तर ‘इतकं’ लाख भाडं

दरम्यान, फहाद फासिलच्या ( Fahadh Faasil ) कामाबद्दल बोलायचं झालं तर तो अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी कोच्चिच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुनने फहादच्या कामाचं कौतुक केलं होतं. अल्लू अर्जुन म्हणाला होता, “माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी सर्वात चांगल्या मल्याळम अभिनेत्यांपैकी एक फहाद फासिलबरोबर काम केलं आहे.”

Story img Loader