scorecardresearch

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चाहत्यांनी केली गैरवर्तवणूक; दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केले लैंगिक छळाचे आरोप

‘बाल्यकालसखी’ या चित्रपटातून तिने अभिनयनात पदार्पण केलं.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चाहत्यांनी केली गैरवर्तवणूक; दाक्षिणात्य अभिनेत्रींनी केले लैंगिक छळाचे आरोप
Malayalam actress sexual harassment

भारतातील मल्याळम चित्रपटसृष्टी कायमच आपले वेगळेपण जपून आहे. दर्जेदार विषय, उत्कृष्ट मांडणी, कलाकारांचे अप्रतिम अभिनय यामुळे मल्याळम चित्रपटांचा चाहता वर्ग मोठा आहे. याच चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मल्याळम अभिनेत्री तिच्या सहकारणीबरोबर काही पुरुषांनी गैरवर्तन केले आहे . या अभिनेत्रीचं नाव आहे सानिया अयप्पन .

सानिया अयप्पन आणि ग्रेस अँथनी यांनी केरळच्या मिलिट मॉलमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेल्या असताना, त्यांनी गर्दीतील लोकांवर लैंगिक छळाचे आरोप लावले आहेत. याबाबतीची पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्यात ती असं म्हणाली आहे, ‘मी आणि माझी चित्रपटाची टीम कालिकतच्या एका मॉलमध्ये ‘सॅटर्डे नाईट’चित्रपटाचचे प्रमोशन करत होतो. कालिकतमधील सर्व ठिकाणी प्रचाराचे कार्यक्रम चांगले पार पडले आणि कालिकतच्या लोकांनी प्रेम दिल त्याबद्दल धन्यवाद. मॉलमधला हा कार्यक्रम खूप लोकांनी खचाखच भरलेला होता. सुरक्षारक्षक गर्दी नियंत्रित करण्यासाठी धडपडत होते’. ती पुढे म्हणाली, ‘कार्यक्रमांनंतर, मी आणि माझी एक सहकलाकार निघून जात होतो आणि एका व्यक्तीने माझ्या सहकारणीबरोबर गैरवर्तन केले आणि गर्दीमुळे तिला पाहण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची संधीही मिळाली नाही. त्यानंतर, माझ्यावरही अशाच प्रकारचे गैरवर्तन घडले’. तिचा एका व्यक्तीला मारहाण करतानाच व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसून येत आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी लैंगिक छळाचे केले आरोप केले आहेत.

सानिया अयप्पन हिने आपल्या करियरची सुरवात टेलिव्हिजन क्षेत्रापासून केली आहे. ‘बाल्यकालसखी’ या चित्रपटातून तिने अभिनयनात पदार्पण केलं आहे. चित्रपटाच्या बरोबरीने ती म्युझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म, वेबसिरीज या माध्यमांमध्ये तिने काम केलं आहे. फिल्मफेअरसारखे पुरस्कारदेखील तिने पटकावले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 17:11 IST

संबंधित बातम्या