मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर जितक्या कमी वेळात प्रकाशझोतात आली तितक्याच वेगाने ती संकटातही सापडली. भुवया उंचावत भर सभागृहात आपल्या प्रियकराकडे पाहत आणि काहीशा खोडकर पद्धतीने प्रमे व्यक्त करत प्रियाने सर्वांची मनं जिंकली. तिच्या हसण्यापासून ते नजरेच्या एका बाणापर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. कित्येकांसाठी तर ती यंदाच्या वर्षी खास व्हॅलेंटाइनही ठरली. अशा या अभिनेत्रीच्या गाण्याला काही ठिकाणी विरोध करण्यात आला. मुख्य म्हणजे थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावण्यापर्यंत हे सर्व प्रकरण पोहोचलं. या साऱ्याला निमित्त ठरलं ते म्हणजे अवघ्या काही मिनिटांचं गाणं.

‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यात प्रियाची झलक पाहायला मिळाली. शान रहमानने संगीतबद्ध केलेल्या आणि विनिथ श्रीवासनने गायलेल्या या गाण्याचा दिग्दर्शक ओमर लूलूने ज्या प्रभावीपणे हे गाणं साकारलं आहे ते पाहता अनेकांनी त्याची प्रशंसा केली. शाळेत विद्यार्थ्यांच्या इतक्या गर्दीत एखाद्या मुलीने तिला आवडणाऱ्या मुलाकडे पाहून असे हावभाव करणं अनेकांसाठी अनपेक्षित होतं. पण, त्याला रसिकांनी चांगला प्रतिसादही दिला. सध्या मात्र त्या व्हायरल दृश्याविषयी काही वेगळीच माहिती समोर येत आहे.

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

प्रियाच्या भुवया उंचावण्याच्या त्या दृश्यात आणि आणखी एका आगामी चित्रपटातील दृश्यात बरंच साधर्म्य असल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी ‘किडू’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्याविषयीची माहिती दिली. यामध्ये दिसणाऱ्या दृश्यात आणि प्रिया, रोशन रहूफवर चित्रीत करण्यात आलेल्या दृश्यात बरंच साधर्म्य दिसत आहे. प्रियाच्याच व्हायरल गाण्यावरुन ‘किडू’मधील हे दृश्य साकारण्यात आलं होतं, अशा चर्चांनी जोर धरला. पण, ‘किडू’चे निर्माते साबू पीके यांनी आपल्या चित्रपटाचं चित्रीकरण ‘उरु अदार लव्ह’च्या आधीच पूर्ण झाल्याचं एका व्हिडिओ मेसेजमधऊन स्पष्ट केलं.

वाचा : …तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

‘माझ्या चित्रपटातील व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही उरु अदार लव्हची नक्कल केल्याचं अनेकांनी म्हटलं. पण, ते चुकीचं आहे. माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण २५ नोव्हेंबर २०१७ला पूर्ण झालं होतं आणि त्याचं संकलनही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण झालं होतं’ हा मुद्दा त्याने मांडला. आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण आटोपल्यानंतरच ‘उरु अदार लव्ह’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर दृश्याची नक्कल करण्याचा आरोप करु शकतो’, असं साबूने सांगितलं. याविषयी आतापर्यंत कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही, असं आपल्याला विचारलं जातं. पण, कोणत्याच प्रकारच्या वादाला तोंड फोडण्याची आपली इच्छा नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. तेव्हा आता या सर्व प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं असून ‘उरु अदार लव्ह’चे निर्माते, दिग्दर्शक यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.