“मी तुझ्या कंबरेवर…”; निर्मात्याची विचित्र कल्पना ऐकून संतापली मल्लिका

ती अनेकदा तिच्या करिअरच्या बाबतीत विविध खुलासे करताना पाहायला मिळते.

बॉलिवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावत ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत आली आहे. मल्लिका ही सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असून कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. ती अनेकदा तिच्या करिअरच्या बाबतीत विविध खुलासे करताना पाहायला मिळते. नुकतंच तिने मुलाखतीत एका निर्मात्याविषयी खुलासा केला आहे. तसेच त्या निर्मात्याला एका हॉट गाण्यासाठी सुचलेल्या विचित्र कल्पनेबद्दलही तिने भाष्य केले आहे.

मल्लिकाने नुकतंच ‘द लव्ह लाफ लाइव्ह’ शो या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिला मुलाखतीदरम्यान तिच्या करिअरबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी मल्लिकाने तिच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा सांगितला. एकदा एक निर्माता माझ्याकडे एका गाण्याची ऑफर घेऊन आला होता. मात्र त्या गाण्याबद्दल त्याची कल्पना फार विचित्र होती. त्यामुळे मी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला, असे तिने सांगितले.

मल्लिकाने मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, “एकदा एक निर्माता गाण्याची कल्पना घेऊन माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की एक छान हॉट साँग आहे. मात्र प्रेक्षकांना कसं कळणार तू हॉट आहेस की नाही? यावर त्याने पटकन म्हटले की मल्लिका तू इतकी हॉट आहेस की मी तुझ्या कंबरेवर चपात्या भाजू शकतो, असा किस्सा तिने सांगितला. यावर मल्लिका म्हणाली, हे सर्व किती विचित्र आहे. तुम्ही कधी हे असं ऐकलं आहे का?” असा प्रश्नही तिने विचारला.

यापुढे मल्लिका म्हणाली, त्यावेळी मी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. “नाही, आपण असे काहीही करणार नाही,” असे मी त्याला सांगितले. मात्र त्यानंतर मला ते फार मजेशीर वाटले. ती एक मूळ कल्पना होती. “भारतात कोणाला हॉट समजले जाते, हे मला अजूनही समजत नाही. मला हे फार विचित्र वाटते. भारतात महिलांच्या हॉटनेसबद्दल खूप गैरसमज आहेत. जे मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला समजले नाहीत. मात्र हे फार विचित्र होते,” असे ती म्हणाली.

‘अनेक अभिनेत्यांनी माझा फायदा…’, मल्लिका शेरावतने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

मल्लिकाने २००३ मध्ये ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने १७ किसिंग सीन्स दिले. त्यानंतर तिने ‘मर्डर’ या चित्रपटात काही बोल्ड सीन्स दिले. पण बोल्ड सीन्समुळे तिच्यावर नेहमी टीका झाली. काही दिवसांपूर्वी मल्लिका ही ‘नकाब’ या सीरिजमध्ये दिसली होती. या वेब सीरिजमध्ये तिने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत इंटिमेट सीन दिल्यामुळे तिची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mallika sherawat reveals a producer once told her you are so hot i can heat chapatis on your waist nrp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या