Viral Video: “कुणीतरी हिला साडी नेसायला शिकवा”; बोल्ड लूकमुळे मल्लिका शेरावत ट्रोल

मल्लिका शेरावत बॉलिवूडपासून दुरावली असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते.

mallika-sherawt-troll-saree
(Photo-Instagram@mallikasherawat)

आपल्या बोल्ड अंदाजासाठी बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडपासून दुरावली आहे. गेल्या काही दिवसांपासून परदेशात असलेली मल्लिका पुन्हा मुंबईत परतली आहे. एका कॉमेडी शोमध्ये मल्लिका जज म्हणून झळकणार आहे. नुकतच या शोच्या सेटवर मल्लिकाला स्पॉट करण्यात आलंय. यावेळी मल्लिकाचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.
मल्लिकाचा सेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात ती व्हॅनिटी व्हॅनमधून उतरताना दिसतेय.

मल्लिकाने साडीप्रमाणे लूक असलेला एक ड्रेस परिधान केलाय. या ड्रेसला एक लांब स्लिट असून यातून मल्लिका तिचे पाय फ्लॉन्ट करताना दिसतेय. नेटचा पदर असला तरी मल्लिकाने परिधान केलेले कपडे नेमका ड्रेस आहे की साडी असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला आहे. या लूकवरून नेटकऱ्यांनी मल्लिकावर निशाणा साधला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

हे देखील वाचा: KBC 13: विरेंद्र सेहवागचे सौरव गांगुलीला चिमटे, धमाल उत्तरं ऐकून बिग बींना फुटलं हसू

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

मल्लिकाच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “कुणीतरी कृपा करून हिला साडी नेसायला शिकवा.” तर दुसरा युजर म्हणाला, ” साडी सारख्या सुंदर वस्राला देखील फॅशनच्या नावावर पूर्ण बिघडवून टाकलं. हद्द झाली.” तर आणखी एक युजर म्हणाला, “पेटीकोट घालायला विसरली वाटतं.”

mallika
(Photo-Instagram@viralbhyani)

मल्लिका शेरावत बॉलिवूडपासून दुरावली असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. मल्लिका तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायमच चर्चेत राहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mallika sherawat troll for wearing bold saree video goes viral kpw