scorecardresearch

४७व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने दिला बाळाला जन्म, २३व्या वर्षी ताई झाल्यानंतर फोटो शेअर करत म्हणाली…

बधाई हो! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने ४७व्या वर्षी दिला बाळाला जन्म, फोटो केले शेअर

arya parvati news
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने ४७व्या वर्षी दिला बाळाला जन्म. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आयुष्मान खुरानाचा ‘बधाई हो’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका साकारलेल्या नीना गुप्ता पन्नाशीत गरोदर असल्याचं दाखविण्यात आलं होतं. असंच काहीसं खऱ्या आयुष्यातही घडलं आहे. प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आर्या पार्वती २३व्या वर्षी मोठी ताई झाली आहे. आर्याच्या आईने ४७व्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

आर्या पार्वतीने तिच्या सोशल मीडियावरुन गरोदर आईचे फोटो शेअर केले होते. २३व्या वर्षी ताई बनण्यासाठी उत्सुक असल्याचं तिने म्हटलं होतं. आर्याने नुकतंच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला मुलाखत दिली. आर्या म्हणाली, “माझी ४७ वर्षांची आई गरोदर असल्याचं कळताच मला धक्का बसला होता. यावर कशाप्रकारे व्यक्त झालं पाहिजे, हे मला कळत नव्हतं. २३व्या वर्षी माझे पालक असं काही सांगतील, याची मी कल्पना केली नव्हती”.

हेही वाचा>> सतीश कौशिक यांची हत्या झाली म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले “तो आयुष्यभर…”

“मला लहानपणापासूनच एक बहीण हवी होती. पण माझा जन्म झाल्यानंतर आईच्या गर्भपिशवीमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे पुन्हा आई होण्यास अडचणी येऊ शकतात, असं तिने मला सांगितलं होतं. आई गरोदर असल्याचं मला आठव्या महिन्यात कळालं. माझ्या वडिलांनी फोनवर मला याबाबत माहिती दिली. सुरुवातीला माझ्या आई-वडिलांनी ही गोष्ट मला सांगितली नव्हती. कारण, यावर माझी प्रतिक्रिया काय असेल, याची त्यांना कल्पना नव्हती. आई गरोदर असल्याचंही त्यांना सातव्या महिन्यात समजलं”, असंही पुढे आर्याने सांगितलं.

आर्या म्हणाली, “आई गरोदर असल्याचं समजताच मी लगेचच घरी गेले. आईच्या कुशीत डोकं ठेवून मी रडायला लागले. मी तिला म्हणाले, मला लाज का वाटेल? मला तर लहानपणापासूनच छोटी बहीण हवी होती. आई आणि बाबा एक दिवस मंदिरात गेले असताना आईला अचानक चक्कर आली. तेव्हा दवाखान्यात गेल्यानंतर ती गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सात महिन्याची गरोदर असूनही आईचं बेबी बंप दिसत नव्हतं”.

हेही वाचा>> “फाफडा लाटण्याने कोण लाटतं?” अरुणाच्या डिशमुळे ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ ट्रोल, नेटकरी म्हणाले “रणवीर ब्रार…”

“माझ्या आईला काही महिने मासिक पाळी आली नव्हती. परंतु, वाढत्या वयामुळे असं झालं असल्याचं आईला वाटलं. त्यामुळे तिने याकडे लक्ष दिलं नाही. माझ्या जन्मानंतर ती पुन्हा आई होऊ शकणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे असं काही होऊ शकेल, याचा त्यांनी विचारच केला नव्हता”, असंही आर्याने सांगितलं. ४७ व्या वर्षी आईने बाळाला जन्म दिल्यानंतर आर्याही आनंदी आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 09:49 IST

संबंधित बातम्या