"माझ्यावर विश्वास ठेवा मी..." मानसी नाईकच्या पतीच्या पोस्टने वेधले लक्ष | manasi naik divorce husband Pardeep Kharera share instagram post said trust me nrp 97 | Loksatta

“माझ्यावर विश्वास ठेवा मी…” मानसी नाईकच्या पतीच्या पोस्टने वेधले लक्ष

या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

“माझ्यावर विश्वास ठेवा मी…” मानसी नाईकच्या पतीच्या पोस्टने वेधले लक्ष
मानसी नाईक प्रदीप खरेरा

अभिनेत्री मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मानसी नाईक ही लवकरच तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. त्या दोघांच्याही वैवाहिक जीवनात वादळ आलं आहे. त्यामुळे मानसीने घटस्फोटासाठी अर्जही दिला आहे. तिने स्वत: याबद्दलची माहिती दिली होती. मानसीने प्रदीप खरेरावर अनेक खळबळजनक आरोप केले होते. आता प्रदीपने तिच्या या आरोपांबद्दल अप्रत्यक्षरित्या पोस्ट केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

प्रदीप खरेरा हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रदीप हा इन्स्टाग्रामवर विविध स्टोरी शेअर करताना दिसत आहे. नुकतंच प्रदीपने इन्स्टाग्रामवर व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो त्याची बॉडी प्लॉनंट करताना दिसत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

“मी प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा मी सर्व गोष्टींवर काळजीपूर्वक नजर ठेवतो”, असे तिने या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रदीपने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने “आपण जे बघतो त्यावर कायमच विश्वास ठेवू नका. ते सर्व खरं असतं असं नाही. कारण मीठही कधी कधी साखरेप्रमाणे असल्याचा भास होतो”, असे म्हटले होते. त्याच्या या पोस्टवरुन अप्रत्यक्षरित्या मानसीच्या आरोपांना उत्तर दिले होते.

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

अखेर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत, अशी कबुली दिली होती. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने त्यात म्हटले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 13:02 IST
Next Story
बेडवरील फोटो शेअर केल्यामुळे ‘तारक मेहता’ फेम प्रिया अहुजा ट्रोल; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…