मंदिरा बेदीने फॅमिली फोटो शेअर करत सहकार्यासाठी लोकांचे मानले आभार

मंदिराने बेदीने जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी एक फॅमिली फोटो शेअर केलाय. यासोबत एक मार्मिक कॅप्शन देखील लिहिलीय.

mandira-raj-1200
(Photo: Mandira Bedi/Instagram)

‘स्वाभिमान’ या टीव्ही मालिकेतून ‘शांती’ची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली मंदिरा बेदी सध्या सर्वात कठिण काळातून जातेय. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या पतीला गमावलंय. ३० जून रोजी तिचे पती राज कौशल यांचं निधन झालं. पती राज कौशल यांच्या निधनानंतर ती एकटी पडली होती. राज कौशल यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा आधार बनत ती स्वतःला यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. तिचे हे कुटुंबच आता तिला या दुःखातून सावरण्यासाठीचं एकमेव कारण बनलंय. तिच्या दुःखात तिला साथ देणाऱ्या जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी नुकतंच तिने एक फॅमिली फोटो शेअर केलाय.

मंदिरा बेदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फॅमिली फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये आपल्या कुटुंबासोबत आनंदी असल्याचं दिसून येतंय. हा फोटो शेअर करताना तिने एक मार्मिक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “मी माझ्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांचे आभार मानते…तुमच्याकडून मिळालेलं खूप सारं प्रेम, समर्थन आणि सांत्वनासाठी खूप खूप आभार…धन्यवाद!” राज कौशल आणि मंदिरा बेदी यांना एक मुलगा वीर आणि एक मुलगी तारा असे दोन अपत्य आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिरा बेदी नेहमीच कठिण परिस्थितीचा मोठ्या साहसाने सामना करत आली आहे. पतीच्या निधनाप्रसंगी काही प्रमाणात ती कोलमडून गेली होती. पतीला अखेरचा निरोप देताना तिला रडू कोसळलं होतं. पती राज कौशल यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत साथ देत तिने आपल्या पतीवर अंत्यसंस्कार देखील केले. यावरून तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंग दरम्यान तिच्या चाहत्यांनी तिचं समर्थन करत तिच्या धाडसाचं कौतुक देखील केलं.

त्यानंतर काही दिवसांचा वेळ घेत ती स्वतःला या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. पतीच्या निधानंतर काही दिवसांनी तिला रस्त्यावर वॉक करताना स्पॉट करण्यात आलं होतं. आता मंदिरा बेदी या धक्क्यातून बाहेर पडली असून तिच्या फॅमिलीला आधार देताना दिसून येत आहे.

मंदिरा बेदीने शेअर केलेल्या या फॅमिली फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. मंदिरा बेदीने हा फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या चार तासांमध्येच १ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. काही चाहते तिच्या या फोटोवर कमेंट करत तिला प्रोत्साहन देत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mandira bedi expressed her gratitude for the love and support of the people by sharing the family picture prp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या