पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिसली मंदिरा बेदी; दुःखातून सावरण्याचा करतेय प्रयत्न

पतीच्या निधनानंतर हळूहळू मंदिरा बेदी आता या दुःखातून स्वतःला सावरतेय. पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मंदिरा बेदी घराबाहेर पडली. रस्त्यावर चालत असतानाचा तिचा एक व्हिडीओ समोर आलाय.

mandira-bedi-takes-walk-with-her-mom-first-appearance-after-husband-raj-kaushal-death

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं काही दिवसांपूर्वीच ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पती राज कौशल यांच्या जाण्यामुळे मंदिरा बेदीला मोठा धक्का बसला होता. हळूहळू मंदिरा बेदी आता या दुःखातून स्वतःला सावरतेय. पतीच्या निधनानंतर पहिल्यांदाच मंदिरा बेदी घराबाहेर पडली. रस्त्यावर चालत असतानाचा तिचा एक व्हिडीओ समोर आलाय.

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदी अगदी कोलमडून गेली होती. इतकंच काय तर पतीचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असतानाच ती ढसाढसा रडली होती. या दुःखातून ती आता स्वतः बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतेय. नुकतंच ती तिच्या आईसोबत रस्त्यावर वॉक करताना दिसून आली. यावेळी ती तिच्या आईसोबत बोलण्यात व्यस्त दिसली. या व्हिडीओमध्ये तिने स्पोर्ट्स वेअर आणि चेहऱ्यावर मास्क परिधान करून आईसोबत बोलत रस्त्यावर चालत होती.

नेहमीच दुसऱ्यांना प्रेरित करत आलेली अभिनेत्री मंदिरा बेदी तिच्यावर कोसळलेल्या या दुःखाचा मोठ्या हिंमतीने सामना करतेय. पतीचा आधार गेल्यानंतर आता तिच्या दोन्ही मुलांसाठी ती पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करतेय. पण तिच्यासाठी हे किती कठिण असेल याची कल्पना देखील करू शकणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राज आणि मंदिरा यांना दोन अपत्य

राज कौशल आणि मंदिरा बेदी हे दोघे गेल्या २५ वर्षापासून एकत्र होते. तीन वर्ष एकमेकांना समजून घेतल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. लग्नाच्या १२ वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. वीर असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. त्यांनंतर २०२० मध्ये एका मुलीला दत्तक घेऊन त्यांची कम्प्लीट फॅमिली तयार केली. त्यांचं कुटुंब आता आता सुख उपभोगत होतं, तितक्यात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पती राज कौशल यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांचं निधन झालं.

 

परंपरेला छेद देत पतीवर केले अंत्यसंस्कार

अभिनेत्री मंदिरा बेदी हिने राज कौशल यांच्या अंतिम क्षणी सुद्धा त्यांची साथ सोडली नाही. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत अभिनेत्री मंदिरा बेदी हिने तिच्या पतीवर अंत्यसंस्कार केले. मंदिरा बेदीच्या पतीचं पार्थिव एका रूग्णवाहिकेमधून स्मशानभूमीकडे नेण्यात येत असल्याचं दिसून येतंय. ती पूर्णवेळ डोळे भरुन राजकडे पाहात होती आणि रडत होती. याच दरम्यान इतर लोकांसोबतच मंदिरा बेदीनं आपल्या पतीचं पार्थिव उचललं आहे. ज्या पतीसोबत आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती, त्याचं पार्थिव उचलताना मंदिराची खूप वाईट अवस्था झाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mandira bedi takes walk with her mom first appearance after husband raj kaushal death prp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या