‘धर्मवीर’ या चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळलेल्या अभिनेता मंगेश देसाई यांचा आज वाढदिवस आहे. मंगेश आज त्यांच्या वयाच्या पन्नाशीत पदार्पण करत आहेत. मंगेश यांना आज लोक ‘क्राईम पॅट्रोल’ मालिकेमुळे ओळखतात. सध्या ते धर्मवीर या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हा चित्रपट ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आहे. या चित्रपटच्या प्रमोशवेळी एका मुलाखतीत मंगेश देसाईंनी या चित्रपटाच्या पडद्यामागचे अनेक किस्से आणि आठवणी शेअर केल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : आनंद दिघेंच्या जयंतीदिनी राजन विचारेंनी जारी केला खास व्हिडीओ; म्हणाले, “…हीच दिघे साहेबांना गुरुदक्षिणा”

मंगेश यांनी ‘दैनिक बोंबाबोंब’ला मुलाखत दिली होती. यावेळी ते म्हणाले होते की, “आनंद दिघे यांच्यावर चित्रपट करू असं गेले अनेक वर्ष माझ्या डोक्यात होतं, पण त्याला हवा तास मुहूर्त लागत नव्हता. २०१३ मध्ये मला आणि माझ्या जवळच्या अनेकांना वाटलं की दिघे साहेबांवर आधारित चित्रपट करावा. त्यावर २०१४, २०१७ आणि २०१९ अशी लागोपाठ तीन वर्ष काम करायचा प्रयत्न झाला, पण तो योग्य येत नव्हता. जो योगायोगाने प्रवीण तरडे सोबत एका छोट्याशा बोलण्यातून जमून आला आणि प्रवीण यांनी सुद्धा शंभर टक्के काम करायचं आश्वासन दिलं”, असे मंगेश म्हणाले.

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

पाहा पोस्ट

आणखी वाचा : “आनंद दिघेंसोबत ज्या घटना घडल्या त्याचा मी साक्षीदार, योग्य वेळी नक्की बोलेन,” एकनाथ शिंदेंचे मोठे विधान

पुढे मंगेश म्हणाले, “दिघे साहेबांबद्दल आमच्याकडे चित्रपट करायचा शंभर टक्के आत्मविश्वास होता पण शंभर टक्के माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांची सावली म्हणून राहिलेल्या मा. एकनाथ शिंदे यांना मी गाठलं. ते सुद्धा अनेकदा या चित्रपटाबद्दल विचारणा करायचे. त्यांनी मला सांगितलं की तुला विश्वास आहे ना तू बिनधास्त पुढे जा कामाला लाग, तुला जी मदत लागेल मी हवी ती मदत करेन. माझे शिंदे साहेबांशी मैत्रीचे संबंध आहेत. त्यांना मी शंभर टक्के माहिती देण्याबद्दल विचारणा केली. त्यांनी मला निर्माता हो असं सांगितल्यावर अडचणी आल्या तर त्यांचा सहभाग असावा असं सुद्धा मी त्यांना म्हणलो आणि त्यांनी निर्मिती करताना भक्कमपणे पाठीशी उभं राहत साथ दिली. जसं दिघे साहेबांकडे एखादा माणूस अडचण घेऊन गेला तर ते सहज अडचण सोडवायला होकार द्यायचे तसंच शिंदे साहेबांचं सुद्धा आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mangesh desai talked about how eknath shinde helped him making of dharmaveer anand dighe movie dcp
First published on: 28-06-2022 at 11:36 IST