मन्नत की अलिबाग…, आर्यनच्या घरवापसीनंतर शाहरुख खान कुठे करणार वाढदिवस साजरा?

आर्यनची सुटका झाल्यामुळे यंदा शाहरुखचा वाढदिवस दणक्यात साजरा केला जाण्याची शक्यता आहे.

फोटो सौजन्य – (शाहरुख खान, आर्यन खान – इन्स्टाग्राम)

बॉलिवूडचा ‘किंग खान’ अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान उद्या ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबई ड्रग्ज प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खानची तब्बल २६ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली. यानंतर आर्यन खानच्या सुटकेनंतर मन्नतमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल २६ दिवसानंतर आर्यनची सुटका झाल्यामुळे यंदा शाहरुखचा वाढदिवस दणक्यात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. पण हा वाढदिवस नक्की कुठे साजरा केला जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्यनच्या सुटकेच्या आनंदात संपूर्ण मन्नत बंगल्याला रोषणाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे शाहरुखच्या वाढदिवसाच्या दोन दिवसाआधीच आर्यनची सुटका झाली आहे. त्यामुळे खान कुटुंबात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र शाहरुख यंदाचा वाढदिवस अलिबागमधील त्याच्या बंगल्यात साधेपणाने साजरा करणार असल्याचे बोललं जात आहे.

शाहरुखच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख हा त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान आणि अबराम खान याच्यासह अलिबागमधील त्याच्या बंगल्यावर जाण्याची शक्यता आहे. पण शाहरुख अलिबागला जाणार की मन्नतमध्ये राहून वाढदिवस साजरा करणार? हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण जर शाहरुख अलिबागमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला तर प्रवास करावा लागेल. या प्रवासादरम्यान अनेक पापाराझी त्याला फॉलो करु शकतात.

आर्यनची सुटका होऊन अवघे दोन दिवस उलटले आहेत. सध्या त्याची मानसिक स्थिती पाहता त्याला कोणताही ताण देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे तो त्याचा वाढदिवस घरातच म्हणजे ‘मन्नत’मध्येच साजरा करु शकतो, असेही बोललं जात आहे. दरम्यान मुलाच्या सुटकेमुळे शाहरुख हा फार चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाचा वाढदिवस तो कसा साजरा करतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ड्रग्ज प्रकरणाचा आर्यन खानला धसका, पूर्वपदावर आणण्यासाठी शाहरुख आणि गौरीची विशेष तयारी

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात होता. त्यानंतर ८ ऑक्टोबरला त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये करण्यात आली. तब्बल २६ दिवस आर्यन खान तुरुंगात होता. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर ३० ऑक्टोबरला त्याची सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच आर्यन ‘मन्नत’वर पोहोचला. आर्यन खानच्या घरवापसीवेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. यावेळी खान कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. आर्यनच्या सुटकेनंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ निवासस्थानाच्या बाहेर चाहत्यांनी पोस्टर दाखवत, फटाके फोडून जल्लोष केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mannat or alibaug where will shah rukh khan will celebrate his birthday nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या