scorecardresearch

“मी माफी मागणार नाही,” त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मन्सूर अली खानची भूमिका; म्हणाला, “थोडी अक्कल…”

“मी माफी मागणारा वाटतो का?” मन्सूर अली खानचे विधान चर्चेत

Mansoor Ali Khan says Wont apologize to Trisha
मन्सूर अली खानने पुन्हा केले वादग्रस्त वक्तव्य (फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेता मन्सूर अली खानने अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्याच्या या आक्षेपार्ह विधानानंतर नादिगर संगम नावाच्या चित्रपट संस्थेने त्यांच्यावर तात्पुरती बंदी घातली. त्यानंतर आज (२१ नोव्हेंबर रोजी) मन्सूर अली खान याने चेन्नईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. आपण केलेल्या विधानासाठी माफी मागणार नसल्याची भूमिका खानने घेतली आहे.

मन्सूर अली खान म्हणाला, “नादिगर संगमने माझ्यावर बंदी घालून चूक केली आहे. हे प्रकरण घडल्यानंतर त्यांनी माझ्याकडे स्पष्टीकरणही मागितले नाही. त्यांनी मला फोन करायला हवा होता किंवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागायला हवे होते. चौकशी व्हायला हवी होती, पण तसं झालं नाही.” यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलंय.

Sukesh Chandrashekhar sends legal notice to Mika Singh
‘त्या’ फोटोमुळे जॅकलिनला ट्रोल करणाऱ्या मिका सिंगवर संतापला ठग सुकेश चंद्रशेखर, तुरुंगातून पाठवली कायदेशीर नोटीस
vicky kaushal calls katrina kaif monster
“ती राक्षसासारखी आहे,” विकी कौशलने पत्नी कतरिनाबद्दल केलं वक्तव्य; म्हणाला, “आम्ही दोघे…”
Gautami Patil
“तू लग्न कधी करणार?” अखेर गौतमी पाटीलने दिलं उत्तर, नवऱ्याबद्दलच्या अपेक्षा सांगताना म्हणाली…
Kangana Ranaut on India Vs Bharat says I dont Hate India Word It Is Our Past
“माझी जीभ घसरते अन्…”, कंगना रणौतचं ‘त्या’ मुद्द्यावर वक्तव्य; म्हणाली, “मला भारतीय दिसायचं नव्हतं, कारण…”

“मी तिला बेडरूममध्ये…”, अभिनेत्याचे त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; संतापलेली अभिनेत्री म्हणाली, “अतिशय अश्लील अन्…”

पुढे तो म्हणाला, “माझ्याविरुद्ध केलेली कारवाई मागे घेण्यासाठी मी नादिगर संगमला चार तासांचा वेळ देतोय. मी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. पण मी माफी मागणाऱ्या व्यक्तीसारखा दिसतो का? मीडिया माझ्या विरोधात वाट्टेल ते लिहू शकते. मी कोण आहे हे लोकांना माहीत आहे. माझ्याकडे तमिळ लोकांचा पाठिंबा आहे.”

“हा विकृतपणा…”, अभिनेत्याने त्रिशाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर चिरंजीवी यांची संतप्त प्रतिक्रिया

मन्सूर अली खान पुढे म्हणाला, “माध्यमांनी त्रिशाची प्रतिक्रिया प्रसिद्ध करताना आमच्या दोघांचे फोटो शेजारी लावले, ते वधू-वरांच्या फोटोसारखे दिसतात. तुम्हा सर्वांकडे माझा एक चांगला फोटो नव्हता का वापरायला? पण त्यातल्या त्यात काही फोटोंमध्ये मी छान दिसतोय.”

त्रिशाबद्दल आक्षेपार्ह विधान करणं अभिनेत्याला भोवणार? राष्ट्रीय महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेत दिले ‘हे’ आदेश

मन्सूर अली खानने आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आणि म्हणाला, “चित्रपटातील बलात्काराच्या सीनचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एखाद्या व्यक्तीवर वास्तविक बलात्कार करणे असा होतो का? सिनेमात खून करणे म्हणजे काय? तुम्ही खरंच एखाद्याचा खून करता का? थोडी अक्कल असायला हवी ना? मी काही चुकीचे बोललो नाही. मी माफी मागणार नाही.” आपण केलेल्या विधानाबद्दल माफी मागणार नाही, असं खानने पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mansoor ali khan says wont apologize to trisha over rape remark hrc

First published on: 21-11-2023 at 15:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×