नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. झुंड या चित्रपटात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांसह अभिनेता भारत गणेशपुरे यांनीही भूमिका साकारली आहे. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
झुंड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक आणि कलाकार कौतुक करताना दिसत आहे. ‘चला हवा येऊ द्या’फेम विनोदवीर आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच भारत गणेशपुरे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर अमिताभ यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘त्यांच्यासोबत काम करणे नेहमीच प्रेरणादायी असते’, असे भारत गणेशपुरे यांनी म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आहे.
दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांनी ‘झुंड’ चित्रपटाबद्दल विविध पोस्ट शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.
“त्याचा प्रश्न आणि तो क्षण…”, अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘झुंड’च्या शूटींगदरम्यानचा किस्सा
‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसत आहे.