scorecardresearch

“शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेलो अन्…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

“शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेलो अन्…” सुप्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा तिन्ही जबाबदाऱ्या हेमंत ढोमे अगदी उत्तमरित्या सांभाळतो. आपल्या कामामधून वेळ काढत तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो. आगामी चित्रपट असो वा आपलं खासगी आयुष्य सगळ्या गोष्टींबाबत सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणं त्याला फार आवडतं. फक्त कलाक्षेत्राबाबतच नव्हे तर राजकीय घडामोडींवरदेखील तो आपलं मत मांडताना दिसतो. पण तुम्हाला माहित आहे का? हेमंतचं उच्च शिक्षण परदेशात झालं आहे.

आणखी वाचा – विवाहित दिग्दर्शकाशी अफेअर, लग्न न करण्याचा निर्णय अन्…; आयुष्यभर एकट्याच राहिल्या आशा पारेख

हेमंत काही वर्षांपूर्वी उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला होता. याबाबतच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच तेथील आपला जुना फोटोही त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. घरापासून दूर गेल्यानंतर मनात काय भावना असतात? हे हेमंतने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तो म्हणाला, “मी माझं एम. एससी (Masters in wildlife conservation) पूर्ण करायला दोन वर्ष केंट युनिर्वसिटी, इंग्लंडमध्ये होतो. त्या दोन वर्षांनी माझं सगळं आयुष्य बदलून गेलं. घरापासून दूर गेल्यावर आपण स्वतःच्या अजून जवळ जातो एवढं नक्की.” तसेच घरापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं असं त्याने आपल्या इतर कलाकार मित्रांनाही विचारलं आहे.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

हेमंतने इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतलं आहे. त्याचा फायदा त्याला कलाक्षेत्रामध्ये काम करतानाही होतो. ‘झिम्मा’ सारखा मराठी चित्रपट त्याने दिग्दर्शित केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला. आताही त्याने दिग्दर्शित केलेला ‘सनी’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या