मालिका, नाटक, चित्रपटासह वेब सीरिज अशा सर्वच क्षेत्रात काम केलेला अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याने मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याचे अढळ स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. जितेंद्र जोशी हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. जितेंद्र जोशी हा लवकरच अभिनेते अनिल कपूर यांच्या थार या चित्रपटात झळकणार आहे. येत्या ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना एक प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल कपूर यांच्या थार या चित्रपटात झळकणार असल्याने सध्या जितेंद्र जोशीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतंच याबाबत त्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला हिंदी चित्रपटात मराठी कलाकारांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम भूमिकेबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, मी एखादा चित्रपट निवडताना त्यातील भूमिका बघूनच निवडतो. यामुळेच मी आतापर्यंत अनेक चित्रपट नाकारले आहेत.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

“महानायकाला आणि महामानवाला तू एकाच फ्रेममध्ये आणलंस हे फक्त…”, ‘झुंड’ पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीची भावूक प्रतिक्रिया

“मला एखाद्या हिंदी चित्रपटाच्या अभिनेत्यामागे उभं राहण्याचे काम मला कधीही करायचे नाही. यावरुन मला माझे अनेक चाहते वेड्यात काढतात. माझ्या या निर्णयावर बोलताना ते म्हणतात की तू वेडा आहे. जर तू हिंदी चित्रपटात झळकलास तरच तुझं भलं होईल. त्यामुळेच तुला चांगले पैसे मिळतील”, असेही त्याने म्हटले.

त्यावर उत्तर देताना जितेंद्र जोशी म्हणाला, “हिंदीतील त्या एका सीनमुळे मला प्रसिध्दी नक्कीच मिळेल, पण मला प्रेक्षकांच्या फक्त हृदयात नव्हे तर मनातही स्थान मिळवायचं आहे. त्यामुळे मी ज्या पद्धतीचे चित्रपट पाहतो, अनुभवतो, अशाच चित्रपटात मला काम करायला आवडतं.”

“आज आमच्या सुतारपक्ष्याचा वाढदिवस असतो…”, अभिनेता जितेंद्र जोशीने पत्नीसाठी लिहिलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

“काही दिवसांपूर्वी एका चित्रपटात मला मोठ्या स्टारच्या मामाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण या भूमिकेसाठी योग्य नाही, म्हणत मी थेट नकार दिला होता. प्रत्येक कलाकाराने नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मी थार या चित्रपटातील भूमिका निवडली कारण ती माझ्या मनासारखी होती”, असेही तो म्हणाला.

“सेक्रेड गेम्स या चित्रपटानंतर अनेक दिवसांनी अशी भूमिका मिळाल्याचा मला आनंद आहे. मला वेळ लागला तरी चालेल, पण केवळ हिंदीमध्ये दिसायचं आहे म्हणून मोठया कलाकारांच्या मागे उभारण्यासाठी मी कधीच होकार देणार नाही”, असे तो ठामपणे म्हणाला.

“हवं तर माझ्याकडून पैसे घ्या, पण माझ्या मुलाला…”; अभिनेते अनिल कपूर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अनिल कपूर आणि हर्षवर्धन यांचा ‘थार’ हा चित्रपट ६ मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनिल कपूर हे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. हर्षवर्धन आणि अनिल कपूरचा हा दुसरा एकत्र चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि हर्षवर्धन यांच्यासोबत सतीश कौशिक, फातिमा सना शेख आणि अक्षय ओबेरॉय हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज सिंह चौधरी यांनी केले आहे. हा चित्रपट ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.