गेल्या महिनाभरापासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित असलेल्या या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. या वेबसिरीजच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित आहेत. या वेबसिरीजमध्ये त्या दोघांचाही बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेता कुशल बद्रिकेने ‘रानबाजार’ या वेबसीरिजसाठी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच कुशलने ‘रानबाजार’ ही वेबसिरीज पाहिल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने या वेबसिरीजमधील कलाकारांचे कौतुक केले आहे.

“मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

कुशल बद्रिकेची इन्स्टाग्राम पोस्ट

“रान बाजार” एक कमाल web Series.

Web series ची Typical गणितं मोडत, समाजाच आणि राजकारणाच वास्तव चित्र दाखवणारी ही Series “कथेच्या नायकातल, अती-सामान्यपण, आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखीत करत रहाते”.

“System नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्यातला जिवंतपणा संपवून टाकते” हेच खर.
अभिजीत पानसे , तेजस्विनी पंडीत, मोहन आगाशे सर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी काका, अनंत जोग सर, माधुरी पवार ह्यांचा भाराऊन टाकणारा Performance ह्या Series चा आत्मा ठरतो.

Personally मला ही Web series खुप आवडली नक्की बघा “रान बाजार” On Planet Marathi

आणि जाता जाता….. “ते कुंडी लगालो सय्यां” गाण काहीच्या काही केलय”, असे कुशलने म्हटले आहे.

प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट

दरम्यान त्याच्या या पोस्टनंतर कुशलने प्राजक्ता माळीची माफी मागणारी एक पोस्टही लिहिली आहे. “मी समस्त news media आणि विशेष प्राजक्ता माळी चे fans यांची क्षमा मागतो, प्राजक्ताच नाव लिहायच चुकून राहिल. प्राजक्ता, पांडू ह्या सिनेमातली माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खुप चांगली मैत्रीण सुद्धा आहे, तुमच्या ह्या news मुळे आता ती बहुतेक “दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जुन जे उटण, तेल वगैरे gift म्हणुन पाठवते ते पाठवणार नाही” तुम्हाला त्याचं पाप लागेल. आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल.”

“प्राजक्ता तु मस्त काम केलस यार . तुला personally sorry म्हणतो. बाकी सगळ्या कलाकारांनीच काय तर त्या घुबडाने सुद्धा भारी काम केलय. तर plz “रान बाजार” बघा”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

“हुं सुरत माटा गयवानू…”, कुशल बद्रिकेची गुजराती भाषेतील ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली आहे. गेल्या २० मे रोजी ‘रानबाजार’ ही वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रदर्शित झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kushal badrike share post for raan bazaar web series and prajakta mali nrp
First published on: 13-06-2022 at 08:04 IST