marathi actor prasad oak meet culture and forest minister sudhir mungantivar for marathi film industry problems spg 93 | ".... आणि एका आठवड्यात GR काढण्याचे आदेश"; प्रसाद ओकची 'ती' पोस्ट चर्चेत | Loksatta

“…आणि एका आठवड्यात GR काढण्याचे आदेश”; प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

साद ओकला नुकतेच दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत

“…आणि एका आठवड्यात GR काढण्याचे आदेश”; प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरदेखील तो सक्रीय असतो. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका होती. त्यानंतर त्याने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

प्रसाद ओक सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. नुकतीच त्याने सांस्कृतिक आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्या संदर्भात त्याने पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहले आहे ‘साहेबांनी मालिका, चित्रपट सर्व क्षेत्रातील संमस्या समजून घेतल्या. तसेच मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या सबसिडीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ज्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळतो अशा चित्रपटांना दुप्पट सबसीडी देणार असे त्यांनी कबूल केले असून त्याबद्दलची पुढची प्रक्रिया त्यांनी चालू केली आहे. तसेच नाट्यगृहांची दुरावस्था, प्राईम टाईम, मल्टिप्लेक्स या विषयांवर चर्चा झाली.’ असे त्याने पोस्टमध्ये लिहले आहे.

प्रसाद ओकला नुकतेच दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ते म्हणजे श्री दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड्स फिल्म फेडरेशनचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ धर्मवीरसाठी आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान पुणे यांचा अभिनय संपन्न रंगकर्मी असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. प्रसादने दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 15:26 IST
Next Story
शैलेश लोढा ‘तारक मेहता…’ मालिकेत परतणार? दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत, म्हणाले…