मिशी काढल्याने तृतीयपंथ्याशी तुलना करणाऱ्याला संतोष जुवेकरचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला “मित्रा जे…”

संतोषच्या या उत्तराला हजारोच्या संख्येने लाईक्स

सोशल मिडियावर कलाकारांना ट्रोल करणं आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. अभिनेता संतोष जुवेकरने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करुन त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न एकाने केला. मात्र संतोषने त्याला जश्यास तसे उत्तर देत ट्रोलरची बोलतीच बंद केली. सध्या संतोषच्या कमेंटचा हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहे.

झालं असं की लॉकडानच्या कालावधीमध्ये सर्व सामान्यांप्रमाणेच दाढीच्या समस्येवर उपाय म्हणून संतोषने क्लीन शेव करुन म्हणून पूर्णपणे दाढी, मिशी पूर्णपणे काढली आणि आपल्या नव्या लूकचा फोटो फेसबुकवर अपलोड केला. लाल रंगाचा बंडाना डोक्यावर बांधलेल्या लूकमध्ये संतोषने सेल्फी पोस्ट केला. “बऱ्याच दिवसांन दाढी भादरलीया. मैत्रिणीला फोटू पाठवला तर म्हनली कवळा रतन दिसतुयास… आयला टाळकंच सरकलंना भावा आपलं तीला म्हनलं… “संतोष नाव हाय माझं ह्यो रतन कोन आणलास आनी?” कधी कधी असं गुळगुळीत पण चरचरित दिसत नाय!? आयला बेन स्वतःचीच लाल करालाय..,” अशी मजेदार कॅप्शन संतोषने या फोटोला दिली होती.

संतोषच्या या फोटोवर चाहत्यांच्या शेकडोने कमेंट आल्या. मात्र त्यापैकी संभाजी पाटील नावाच्या एका युझरने संतोषला ट्रोल करण्यासाठी त्याच्या फोटोवर, “मिशी काढल्यामुळं छक्यासारखा दिसतोय” अशी कमेंट केली. संतोषनेही या कमेंटला उत्तर दिलं. “मित्रा जे नाव टीका करण्यासाठी उच्चारला आहेस, त्या नावात खूप मोठी ताकद आहे. पुरुष आणि आदिशक्ती स्त्री या दोघांचीही ताकद सामावली आहे ना, तो देवाचा आणि निसर्गाचा अविष्कार आहे हे नाव. आदर करतो मी त्याचा. तुही कर आणि खरा पुरुष हो भावा,” असा टोला संतोषने या टीकाकारला लगावला. संतोषने या कमेंटचा आणि त्याला दिलेल्या रिप्लायचा स्क्रीनशॉर्टही शेअर केला आहे. “मी आत्ता माझा एक फोटो पोस्ट केला त्यावर ही एका आपल्या मित्रानं कमेंट केली त्यावर माझा विचार त्याला उत्तरात दिलाय. माझा राग नाही त्याच्यावर आणि तुम्हीही करू नका पण अर्धनारी नटेश्वराला प्रार्थना करूया अशा विचारांच्या माझ्या मित्रांना लवकर बरं कर रे देवा,” अशी कॅप्शन या संवादाचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत संतोषने दिली आहे.

संतोषने शेअर केलेल्या या स्क्रीनशॉर्टला तीन हजार ५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर ७०० हून अधिक जणांनी या फोटोवर कमेंट करुन संतोषने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले आणि ज्या पद्धतीने ट्रोलरची बोलती बंद केली त्यासंदर्भात कौतुक केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actor santosh juvekar slams troller for saying he looks like transgender scsg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या