scorecardresearch

“जात संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे”, अभिनेते शरद पोंक्षेचे जाहीर आवाहन

नुकतंच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शरद पोंक्षे यांनी जातीयवादावर भाष्य केले.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. अभिनेते शरद पोंक्षे अनेकदा विविध राजकीय गोष्टींवर मत मांडताना दिसतात. नुकतंच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शरद पोंक्षे यांनी जातीयवादावर भाष्य केले.

शरद पोंक्षे हे गेल्या काही दिवसांपासून ‘हे राम,नथुराम’ या नाटकामुळे चर्चेत आहे. पण गांधी विचारांना धक्का लावणारे हे नाटक आहे, अशी टीका अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी हे नाटक करणे थांबवले आहे. मात्र अनेक व्याख्याने आणि चर्चासत्रातून ते त्यांचे विचार मांडताना दिसतात. नुकतंच पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी जातीयवादावर स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

“राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची…”, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत

“अनेक जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले आहे. ते स्वच्छ करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा. फुले, शाहू, आंबेडकरांनीही समाजसुधारणा केली आहे. त्यात ब्राह्मणांचाही वाटा मोठा होता. मात्र, जात संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे”, असे आवाहन अभिनेते शरद पोंक्षे यांनी यावेळी केले.

“हिंदी सिनेसृष्टीला मी परवडणार नाही, त्यामुळेच…”, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने बॉलिवूडबद्दल मांडलं स्पष्ट मत

“मी गेले १५ वर्षे जात संपविण्यासाठी व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो, तरी मला जातीचा गर्व नाही. जात ही संपलीच पाहिजे. त्यापेक्षा मनुष्य धर्म टिकला पाहिजे. जात संपणे अशक्य आहे, पण त्यासाठी प्रयत्न करु नये, असे म्हणून चालणार नाही. कारण कधीतरी जात संपवण्यात कधीतरी यश मिळेल आणि आपले राज्य, देश कधी तरी जातमुक्त होईल”, असेही शरद पोंक्षे म्हणाले.

“तू या क्षणी जिथे असशील तिथे…”, समीर चौगुलेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“सध्या जाती जातींमध्ये फार मोठी तेढ निर्माण झाली आहे. मराठा, कुंभार, ब्राह्मण असे विविध जातींचे संघ निर्माण झाले आहेत. हे सर्व संपवायला हवेत, फक्त एकच हिंदू जात राहायला हवी. सध्या मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास सुरु केला आहे. मला जेवढे सावरकर प्रिय आहेत, तेवढेच मला बाबासाहेब आंबेडकर देखील प्रिय असल्याचे शरद पोंक्षे यांनी यावेळी सांगितलं.”

शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रात त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. नाट्यसृष्टीबरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र, शरद पोंक्षे हे त्यांच्या विविध विधानांमुळे सतत चर्चेत असतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor sharad ponkshe appeal brahman society to end casteism nrp