मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारणारे शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच शरद पोंक्षे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध मुद्द्यांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी राज ठाकरेंच्या यांच्या कालच्या सभेतील भाषणावर वक्तव्य केले. “आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब.”, अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.

kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री

“राज्य सरकारला जे करायचंय ते करावं, आम्ही मागे हटणार नाही”, राज ठाकरे यांचा ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम

शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्ट करत यावर भाष्य केले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक लाइक्स कमेंट पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देताना सहमत असल्याचे सांगितले आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच”, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरून लक्ष्य ठरलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात ‘उत्तर सभा’ झाली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

“मशिदींवरील भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कोठे आहे? तुम्हाला जो नमाज पढायचा आहे, अजान द्यायची आहे ते घरात करा. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? हे भोंगे खाली उतरवा, आम्हाला त्रास देऊ नका हे सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार.” असेही राज ठाकरेंनी सांगितले.

“वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नाहीच, हा सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टीचा त्रास होतो. तुम्ही दिवसभरात ५-५ वेळा नमाज पढता, बांग देता. एकतर सगळे बेसूर असता. काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावर घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो. फुटपाथवर घाण झाली तर फुटपाथ साफ करतो, मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत,” असंही राज ठाकरे म्हणाले.