वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याच्या धक्काडायक घटनेनंतर सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते तब्बल ६ महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. पोलिस चौकशीत या सगळ्या भयावह गुन्ह्याची तिच्या प्रियकराने कबुली दिली आहे.

मृत तरुणीचं नाव श्रद्धा वालकर असं आहे. तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. घरच्यांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत राहायला आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे. तसंच मृतदेहाचे काही तुकडे हाती लागल्याची माहिती दिली आहे.

आणखी वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खानचा मोठा निर्णय; म्हणाला “पुढील दीड वर्षं तरी अभिनय…”

या एकूणच प्रकाराकडे सोशल मीडियावर ‘लव जिहाद’च्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. सामान्य व्यक्तिपासून सेलिब्रिटीपर्यंत कित्येक लोक व्यक्त होत आहेत. मराठी अभिनेत्री केतकी चितळेने या कृत्याचा निषेध केला आहे. अत्यंत कडव्या शब्दांत तिने याची निंदा केली आहे. पाठोपाठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनीदेखील याविषयी खेद व्यक्त केला आहे.

sharad ponkshe post

फेसबूकवरील एका यूझरची पोस्ट शेअर करत शरद पोंक्षे यांनी याबद्दल खेद व्यक्त केला आहे. “मुलींनी जागरूक व्हायला हवं” असा एक सल्लाच त्यांनी ही पोस्ट शेअर करताना दिला आहे. त्यांच्या या पोस्टवरही कित्येक लोकांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. काही महिला यूजर्सनी तर जरा नाही जास्तच जागरूक व्हायची गरज आहे असं कॉमेंटमध्ये लिहिलं आहे. या प्रकरणात न्यायव्यवस्था आफताबला काय शिक्षा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.