मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सुमीत राघवनला ओळखले जाते. तो सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. सुमीत राघवने गोरेगाव येथील आरे कारशेडला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. नुकतंच त्याने यासंदर्भात एका ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने आरे कारशेड विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर एका नेटकऱ्यामध्ये आणि सुमीत राघवनमध्ये ट्वीटरवॉर पाहायला मिळाले.

नेमकं प्रकरण काय?

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”

सुमीत राघवनने दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट रिट्वीट केले आहे. त्यात त्याने एक व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. या व्हिडीओला फ्रेंचचे काही नागरिक क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना असं कॅप्शन दिलं होतं. सुमीतनं हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

“आरेच्या आंदोलकांबरोबर आपणही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले होते, बोगस फालतू लोक. काही कामाचे ना धामाचे”, असे त्याने हा व्हिडीओ रिट्वीट करताना म्हटलं आहे. याद्वारे त्याने आरे आंदोलकांची खिल्ली उडवली आहे. यावरुन एका नेटकऱ्याने दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचे एक मीम शेअर केले आहे. या मीमवर ‘तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून पण नीच आहेस’, असा एक डायलॉग लिहिण्यात आला आहे.

सुमीतने त्या नेटकऱ्याचे हे ट्वीट पाहताच त्याला हसतच खोचक टोला लगावला आहे. “शेवटी आधार तुला माझ्याच व्यवसायाचा घ्यावा लागला? स्वतःचं काहीच नसलं की असं होतं.. असो. विक्रम काकांना त्या निमित्ताने तू श्रद्धांजली दिली.. मोठा नट होता..”, असे सुमीतने यावेळी उत्तर देताना म्हटले. त्यावर त्या नेटकऱ्याने “तुम्हा दोघांना हा डायलॉग चपखल लागू होतो म्हणून ट्विटला आहे. आणि तो बरोबर काळजात लागला आहे, हे तुमच्या बोलण्यावरून दिसत आहे”, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे.

त्यावर सुमीत प्रतिक्रिया देत म्हणाला, “विक्रम काका ह्यांचं निधन झालंय काही दिवसांपूर्वी आणि हे तुझे विचार….एक काम कर आई बाबांना किंवा घरच्या मोठ्यांना हे तुझं ट्विट ऐकव. मग बघ त्यांच्या काळजाला किती लागतं ते आणि त्यांची प्रतिक्रिया रेकॉर्ड करून पाठव. मी इथेच आहे ..”

यावर तो नेटकरी म्हणाला, “तुमच्या पत्नीला आणि मुलाबाळांना तुम्ही मूळ ट्विट मधून जी विकृती दाखवली आहे ते व्यक्त करून दाखवा. तुमच्या घरच्यांची मान शरमेने खाली जाईल.” यावर सुमीतने “मित्रा गेलेल्या माणसाबद्दल तू बोलला आहेस. उगाच सारवा सारव करू नकोस”, अशी कमेंट केली आहे. तसेच “ताळ तंत्र सोडून बोलण्याचा उत्तम नमुना बघा. विषय सुरू होता आरे कार शेडचा.. आणि ह्याने कुठल्या थराला नेला द्वेष. काही गरजच नव्हती इतकं विषारी होण्याची. स्वतःच्या मनासारखं झालं नाही तर गेलेल्या माणसाला देखील सोडत नाहीत हे लोक”, असेही सुमीतने ट्वीट करत म्हटले आहे.

त्यावरही त्या नेटकऱ्याने संताप व्यक्त करत ट्वीट केले आहे. “ताळतंत्र सोडून हिंस्त्र भाषा तुम्ही मूळ ट्विटमध्ये वापरली. त्याला एका मिम टेम्प्लेटने उत्तर दिले तर आकांडतांडव करायला लागलात. मग हे नाही जमले तर मी कसा सभ्य आहे अन समोरचा कसा मला त्रास देतोय हे व्हिक्टिम कार्ड खेळायला सुरुवात केली. कमाल करता ब्वा”, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. यावर सुमीतनेही त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. “व्हिक्टिम कार्ड.. मी? गेलेल्या माणसाला सोडत नाहीस वर मला नीच आणि भिकारडा म्हणालास.. असो .. मुद्दा काय होता? आरे..बरोबर? संपला विषय, म्हणजे विषय संपलाच. कारण आरे कारशेड तिथेच होणार.. चल.. पुढच्या वेळेला मुद्दा धरून बोल.”, असे सुमीतने म्हटले आहे.

त्यापुढे त्या नेटकऱ्याने “मिम्स टेम्प्लेटचा घाव अजून काही दिवस भरणार नाही असे एकंदर दिसते आहे. घाव बरा होईपर्यंत मिम्स काय असते शिकून घ्या आणि आरे कारशेड होईल की नाही तो पुढचा भाग राहिला, पण आंदोलकांना चिरडून टाकायची तुमच्या मनातील हिस्त्र विकृती सगळ्यांनी पाहिली आहे”, असे त्याने ट्वीट केले आहे. त्यावर उत्तर देताना सुमीतने त्याला खोचक शब्दात प्रश्न विचारला आहे. “चिरडून???? अरे बाळा शांत झोप आता . बरळू नकोस.. बरं मेट्रो सुरू झाल्यावर प्रवास कर … बरं पोटापाण्यासाठी काय करतोस? फक्त कुतूहल म्हणून विचारतोय…”, असे सुमितने म्हटले आहे.

“मेट्रोला कुणी विरोध करत नाही, कारशेड जिथे होतोय त्याला आहे. हे असले बाळबोध लॉजिक वापरून स्वतःच्या बुद्धीचे ओंगळवाणे प्रदर्शन करू नका. बाकी कुतूहल म्हणून हा फक्त…तुम्ही जन्मत:च हिंस्र विकृत आहात की पोटापाण्यासाठी हे सगळं करताय? जस्ट कुतूहल म्हणून विचारतोय”, असा प्रश्न त्या नेटकऱ्याने केला आहे. त्यावर त्याने काहीही उत्तर दिलेले नाही.

आणखी वाचा : अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

दरम्यान सुमीतने केलेल्या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी त्याच्यावर टीका केली आहे. मात्र सध्या त्याचे आणि एका नेटकऱ्यामध्ये रंगलेले ट्वीटर वॉर चर्चेचे कारण ठरताना दिसत आहे.