असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला मराठमोळा अभिनेता म्हणून सुयश टिळकला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वी सुयश टिळक याने अभिनेत्री आयुषी भावे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. सुयश टिळकची पत्नी आयुषी ही एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच आयुषीने तिच्या रस्त्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आयुषी भावे-टिळक ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच आयुषीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती चल छय्या छय्या या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत मुलगी झाली हो मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीडही नाचताना दिसत आहे. ते दोघेही डोंबिवलीतील एका रस्त्यावर नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

‘वीर दौडले सात’ चित्रपटात सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयुषी आणि सिद्धार्थ लवकरच एका वेबसीरीजमध्ये एकत्र झळकणार आहे. याच वेबसीरीजच्या शूटींगसाठी ते दोघेही एकत्र आले होते. याच निमित्ताने त्यांनी हा रिल व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवर सुयशने देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्यांनी गेली दोन वर्ष…”, ‘चंद्रमुखी’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिनेता सुयश टिळक याने कमेंट करताना इमोजींचा वापर केला आहे. यात त्याने फायर आणि हार्ट असे दोन इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुयश टिळकसोबतच अनेक कलाकार यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

Story img Loader