स्वप्नील जोशीचं वेबविश्वात पदार्पण; झळकणार ‘या’ वेब सीरिजमध्ये

स्वप्नीलसोबत तेजस्विनी पंडित स्क्रीन शेअर करणार आहे

स्वप्नील जोशी

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्यांच्या भूमिकांविषयी सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याची चॉकलेट बॉय म्हणून निर्माण झालेल्या ओळखीला तो छेद देण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटात तो पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत झळकला. विविध चित्रपटांमध्ये झळकलेला स्वप्नील लवकरच वेबविश्वात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे या नव्या वेबसीरिजमध्ये तो एक आगळ्यावेगळ्या रुपात दिसणार आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा दिग्दर्शक सतीश राजवाडे याची समांतर’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजमध्ये स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर सतिश राजवाडे या सिरीजचं दिग्दर्शन करणार आहे.

वाचा : शिल्पा शेट्टी, राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल

या वेबसीरिजमध्ये स्वप्नील कोणाचा तरी शोध घेत आहे. त्याचा या शोधाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. ‘समांतर’ वेबसीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या ९ मार्चला या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actor swapnil joshi new web series samantar ssj