Video : मी सिनेसृष्टीत जातीयवाद अनुभवलेला नाही – विक्रम गोखले

विक्रम गोखले लवकरच ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात झळकणार आहेत

ब्राह्मण कलाकारांबद्दल दिग्दर्शक सुजय डहाकेने केलेल्या वक्तव्यानंतर मराठी सिनेसृष्टीत एकच चर्चा रंगली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. तर ब्राह्मण महासंघानेदेखील सुजयच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. याविषयी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीदेखील त्यांचं मत व्यक्त केलं आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“कलाविश्वात जातीयवाद आताचा नाही, फार वर्षांपासून या जातीयवादाला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर त्यासाठी काही ठरलेली माणसं कार्यरत आहेत. ही खरंच चिंतेची बाब आहे. मात्र, आपण काहीच करु शकत नाही”, असं विक्रम गोखले म्हणाले.

जातीयवादाचा अनुभव आला का?

कलाविश्वात कार्यरत असताना तुम्हाला कधी जातीयवादाचा अनुभव आला का? असा प्रश्नही विक्रम गोखले यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देत, “सिनेसृष्टीमध्ये मी कधीही जातीयवाद अनुभवला नाही किंबहुना माझ्या सहकार्यांसोबतही असं झाल्याचं माझ्या लक्षात नाही”, असं विक्रम गोखले यांनी सांगितलं.

विक्रम गोखले लवकरच ते ‘एबी आणि सीडी’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्यासोबत  स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे मराठीतील ज्येष्ठ अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशहा अशा दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना  मिळणार आहे. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले पहिल्यांदाच आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actor vikram gokhale open up sujay dahake statement ssj 93 svk88

ताज्या बातम्या