अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांचं रिलेशनशिप काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. शिवानी-विराजस बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील एकमेकांसोबतचे फोटो हे दोघं शेअर करताना दिसतात. मराठी कलाविश्वातील ही लोकप्रिय जोडी एकत्र अगदी गोड दिसते. हे दोघं लग्न कधी करणार? याची वाट त्यांचे चाहते पाहत असतानाच एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

शिवानी-विराजस लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नविधीला देखील आता सुरुवात झाली आहे. शिवानीने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या मेहंदीचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती भलतीच गोड दिसत आहे. शिवानीच्या चेहऱ्यावर एका वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत आहे.

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

शिवानीने तिच्या मेहंदी सोहळ्यासाठी हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. काठपदर साडीच्या साहाय्याने हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. तसेच आपला लूक अधिक उठून दिसावा म्हणून तिने फुलांचे दागिने देखील परिधान केले आहेत. फुलांचे दागिने तिच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालत आहेत. आपल्या मेहंदी सोहळ्यासाठी शिवानीने अगदी पारंपरिक ड्रेसची निवड केली आहे. शिवानी-विराजसवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा – दुबईमध्ये भररस्त्यात मुलीने कपिलच्याच कानशिलात लगावली, VIRAL VIDEO मागचं सत्य काय?

शिवानी आणि विराजसच्या लग्नसोहळ्याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवानी-विराजस दोघंही उत्तम कलाकार आहे. विराजस तर अभिनयाबरोबर दिग्दर्शक म्हणूनही उत्तम काम करतो. आता दोघंही त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करणार आहेत.