‘आपण ठरवू तो दिवस शुभारंभ’

नवीन वर्ष सुरु होत म्हणून नवीन संकल्प करावा यावर माझा फारसा काही विश्वास नाही.

चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. हा दिवस म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. दिनदर्शिकेप्रमाणे इंग्रजी नववर्ष तर सर्वचं साजरे करतात. पण आपले मराठी कलाकार गुढीपाडवाही तितक्याचं उत्साहात साजरा करतात. पाडव्याच्या निमित्ताने मराठी कलाकार हा दिवस कसा साजरा करतात ते जाणून घेतले.

abhijeetनवीन वर्ष सुरु होत म्हणून नवीन संकल्प करावा यावर माझा फारसा काही विश्वास नाही. माझ्याकडून ज्या काही गोष्टी मागे राहून गेलेल्या असतात त्या मी यानिमित्ताने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. नवीन वर्ष साजरं करायचं म्हणाल तर माझे आईबाबा हे नाशिकला राहतात तर माझी पत्नी सुखदाचे आईवडिल पुण्याला राहतात. त्यामुळे आम्हाला कामामुळे काहीवेळा त्यांच्यासोबत गुढीपाडवा साजरा करता येत नाही. पण यंदा आम्ही नाशिकला सुखदाच्या आईबाबांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत. – अभिजीत खांडकेकर

adinathगुढीपाडवा हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. यादिवशी माझ्या आजोबांचा वाढदिवस असल्यामुळे माझ्यासाठी तर हा दिवस जास्तचं आनंदाचा असतो. त्यामुळे सकाळी आजोबा, बाबा आणि मी मिळून गुढी तयार करून गच्चीवर उभारतो. त्यादिवशी आम्ही सर्वजण पारंपारिक पोशाखात आपल्या नवीन वर्षाचे स्वागत करतो. या दिवशी सगळे नातेवाईक आमच्या घरी येतात आणि संध्याकाळी आम्ही केक कापून आजोबांचा वाढदिवस साजरा करतो. माझा यावर्षीचा संकल्प….रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. मी रात्री चित्रपट बघतो किंवा पुस्तक वाचत बसतो त्यामुळे ब-याचं वेळा मी रात्री उशीरा झोपतो आणि सकाळी उठायलाही उशीर होतो. तर माझा यंदा हाच संकल्प आहे की, मी रात्री वेळेवर झोपणार आणि लवकर उठणार. – आदिनाथ कोठारे

maheshमाझ्यासाठी इंग्रजी नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्ष यासाठी काही फारसा उत्साह नसतो. ३१ डिसेंबर रात्री उशीरापर्यंत जागून धांगडधिंगा करणे किंवा पार्टी करणे हे मला पटत नाही. त्याचप्रमाणे माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा नवी सुरुवात आहे. त्यामुळे यादिवशी काही विशेष न करता केवळ गुढी उभारून हा दिवस साजरा करतो. जमलचं तर या दिवशी मी नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करतो. – महेश मांजरेकर

surbhiनवीन वर्ष म्हणून माझा कधीच काही संकल्प नसतो. माझ्या मते आपण ठरवू तो दिवस शुभारंभ असतो. उद्या किंवा दोन महिन्यांनी माझं मत बदलू शकतं त्यामुळे मी कधी संकल्प करत नाही. ज्याप्रमाणे १ जानेवारीला नवीन वर्ष सुरु झाल्यावर आपण जोमाने कामाला सुरुवात करतो तसचं आपलं मराठी नवीन वर्ष सुरु झाल्यावर सर्वांनी जोमाने कामास सुरुवात करावी असं मला वाटतं. मी न्यू ईयर फारसा उत्साहात साजरं करत नाही. पण गुढीपाडवा हा आपला मराठमोळा सण आहे. तो मी माझ्या घरच्यांसोबत नेहमी साजरा करते. यावर्षी मात्र, माझं शूट मुंबईमध्ये असल्यामुळे मला घरच्यांसोबत गुढीपाडवा साजरा करता येणार नाही. – सुरभी हांडे

suyashगुढीपाडव्यादिवशी मराठी कलाकारांची पार्टी असते त्यामुळे ते एक सेलिब्रेशन होतचं. गुढीपाडवा हा शुभमुहुर्त असल्यामुळे हा दिवस माझ्यासाठी नेहमीच खास असतो. आपली संस्कृती, पावित्र्य यानिमित्ताने आपण जपतो. पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी असल्याने त्या प्रथेप्रमाणे या दिवशी मी काहीनाकाही खरेदी करतो. त्यानंतर संपूर्ण युनिटसाठी काहीतरी पदार्थ नेऊन त्यांचं तोड गोड करतो. यंदाचा पाडवा तर माझ्यासाठी अधिकचं खास आहे. कारण, माझ्या कॉफी आणि बरचं काही या चित्रपटाच्या प्रमोशनला माझ्यापासून सुरुवात होणार आहे. – सुयश टिळक
(शब्दांकन- चैताली गुरव)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actors celebration of gudhipadwa