नाट्यगृहात प्रयोग सुरु असताना कलाकारांना अनेक समस्यांचा सामना करावा वागतो. कधी नाट्यगृह स्वच्छ नसते तर कधी एसी काम करीत नाही. गेल्या काही वर्षापासून नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांचे सतत वाजणारे मोबाईल हे कलाकारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेकवेळा प्रयोग सुरु असताना प्रेक्षक मोबाईल बघत असतात किंवा त्यांचे मोबाईल मध्येच मोठ्याने वाजतात यामुळे प्रयोग करणाऱ्या कलाकाराचे लक्ष विचलित होते. मध्यंतरी या समस्येकडे अनेक मराठी कलाकारांनी लक्ष वेधले होते. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता सुभाषने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : कतरिना कैफने चित्रपटाचे कौतुक केल्यावर विकी कौशल झाला रोमॅंटिक; पत्नीसाठी शेअर केली खास पोस्ट

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

नाट्यगृहात प्रेक्षक जेव्हा मोबाईलचा वापर करतात किंवा मोबाईलची लाईट मध्येच ऑन करतात तेव्हा कलाकारांच्या प्रतिक्रिया काय असतात? यावर ‘प्लॅनेट मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अमृता सुभाष म्हणाली, “मी गिरीश जोशी यांच्याबरोबर काम केलेय, ते म्हणतात ना ‘चुकीला माफी नाही’ अगदी याचप्रकारे गिरीश कधीच प्रेक्षकांच्या अशा चुकांना माफी देत नाही आणि नाट्यगृहांमध्ये असे वागणे एकदम चुकीचे आहे. कित्येकदा आम्ही नाटक मध्येच थांबवून प्रेक्षकांना विनंती करतो हळूहळू या गोष्टी कमी होतील अशी मला आशा आहे. हल्ली लोकांचे मोबाईल वाजत नाहीत, ते मध्येच स्क्रिन ऑन करतात त्यामुळे चेहऱ्यावर लाईट येतो…लोकांना हे लक्षात येत नाही, परंतु संपूर्ण अंधारात असा मध्येच मोबाईल ऑन केल्यामुळे सादरीकरण करणाऱ्या कलाकाराचे लक्ष विचलित होते.”

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’वर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बीना पॉल यांची सडकून टीका; म्हणाल्या, “तथ्यहीन, चुकीचा चित्रपट…”

अमृता सुभाषसह या मुलाखतीला अभिनेत्री व लेखिका मुग्धा गोडबोले सुद्धा उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, “प्रेक्षक जेव्हा असं काही वागतात तेव्हा सादरीकरण करणाऱ्या कलाकाराच्या मनात प्रश्न निर्माण होतो आपण उत्तम करतोय की नाही? आपण कुठे कमी पडतोय का? यामध्ये हळूहळू बदल करण्यासाठी प्रेक्षकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.”

हेही वाचा : “हे ईश्वर प्राप्तीसमान…” स्तनपानाबद्दल अभिनेत्री देबिना बॅनर्जीचं मोठं वक्तव्य

दरम्यान, यापूर्वी नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांच्या सतत वाजणाऱ्या मोबाईलबाबत अभिनेता सुमित राघवन आणि सुबोध भावे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.