“गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं” असं म्हणत जवळपास तीन वर्षांपूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये आजही तितही लोकप्रिय आहे. या मालिकेतील राधिका ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अनिता दाते हिने साकारली होती. अनिता दाते ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सध्या तिच्या एका पोस्टने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिता दातेने नुकंतच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने स्वत:चा हार घातलेला एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून अनेक चाहत्यांना तसेच कलाकारांना धक्का बसला आहे. तिने हा फोटो शेअर करताना फार हटके कॅप्शन दिले आहे. “जो आवडतो सर्वांना…” असे कॅप्शन अनिता दातेने दिले आहे. तिच्या या फोटोमुळे आणि कॅप्शनमुळे सर्वांना धक्का बसला आहे.

“आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन…”, अभिनेत्री अनिता दातेची फेसबुक पोस्ट चर्चेत

तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. अभिनेत्री श्रृती मराठे हिने यावर ‘काय हे’ अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री स्नेहा माजगावकर हिने यावर कमेंट करत ‘अग काय झालंय नक्की काय? अग बोलना’ असे विचारले आहे. त्यासोबत तिने रडतानाचे इमोजी शेअर केले आहेत. तर अभिनेता सुहास शिरसाठ याने ‘सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत ना तुझ्या? नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही’, अशी कमेंट केली आहे.

तर अनेक नेटकऱ्यांनी तिचा हा फोटो पाहून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. ‘क्षणो क्षणी माझ्या मनात तुझी आठवण राहील. RIP’, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. ‘हे खूप धक्कादायक आहे…असं अचानक एवढ्या मोठ्या कलाकाराचं जाणं…’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

‘लग्नानंतर पत्नीला घरकामात मदत करतोस का?’ राजकुमार राव म्हणाला, “मी भांडी आणि झाडू…”

दरम्यान अनिता दातेची ही पोस्ट नेमकी कोणत्या कारणासाठी आहे? याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. तिने हा असा फोटो का शेअर केला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपट, मालिका, नाटक याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी कलाकार विविध युक्त्या वापरताना दिसत आहे. त्यामुळे तिचा हा फोटो प्रमोशनच्या निमित्ताने केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने अनिता दातेला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. २०१६ ते २०२१ म्हणजे जवळपास पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. अनिता दातेने या मालिकेत राधिकाची भूमिका साकारली होती. मी वसंतराव, अय्या, तुंबाड, कॉफी आणि बरंच काही अशा अनेक चित्रपटातून अनिताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चला हवा येऊ द्या शोमध्येही अनिताने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress anita date getting troll after share instagram post nrp
First published on: 07-07-2022 at 17:18 IST