Lockdown : अश्विनी भावेंनी असा साजरा केला ‘वसुंधरा दिन’; पाहा व्हिडीओ

२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून ओळखला जातो

२२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून ओळखला जातो. पृथ्वीविषयीची कृतज्ञता आणि तिच्या संवर्धनाविषयी जाणीवजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सध्या जगावर करोना विषाणूचं संकट आहे. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. मात्र या काळातही अभिनेत्री अश्विनी भावे यांनी घरी राहूनच हा दिवस साजरा केला आहे.

मराठी कलाविश्वातील ९० चा काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणून अश्विनी भावे यांच्याकडे पाहिलं जातं. लग्न केल्यानंतर विदेशात स्थायिक झालेल्या अश्विनी यांना झाडांची विशेष आवड आहे. घरी फावल्या वेळात त्या त्यांचा बराचसा वेळ बागेत, झाडांसोबत घालवत असतात. झाडांची काळजी घेणं, त्यांचं संगोपन करणं हा त्यांचा आवडता छंद असल्यामुळे यंदाचा अर्थ डेदेखील त्यांनी झाडांच्याच संगतीत साजरा केला.

अश्विनी भावे यांनी अर्थ डे च्या निमित्ताने त्यांच्या बागेमध्ये आंबा, पेरू यांची लागवड केली आहे. यापूर्वीदेखील त्यांनी आंब्याचं झाडं लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते मातीत तग धरू शकलं नाही. त्यामुळे अर्थ डेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे झाड लावायचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान,१९७० पासून २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभरातील १९३ देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक देशामध्ये काही वार्षिक कार्यक्रम, चर्चासत्रं आयोजित केली जातात. मात्र करोनाचं सावट असल्यामुळे अर्थ डेवर त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. याच कारणास्तव अश्विनी यांनी घरीच हा दिवस साजरा केला. अश्विनी भावे या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्यांचे ‘किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ हे चित्रपट तुफान गाजले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Marathi actress ashvini bhave celebrating earth day ssj

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन