करोना महामारीनंतर तब्बल २ वर्षांनी पांडुरंगाच्या पंढरीत पुन्हा एकदा हरीनामाचा गजर ऐकायला येऊ लागला आहे. सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीची सर्वत्र चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामे बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत सहभागी होताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकारही पंढरपूरच्या वारीत सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

दिपाली सय्यद या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. त्या नेहमी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतात. दिपाली सय्यद या देखील पंढरीच्या वारीत सहभागी झाल्या होत्या. त्याचे काही फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. तसेच त्याला त्यांनी हटके कॅप्शनही दिली आहे.

“विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती?”, दिपाली सय्यदला पडला प्रश्न

“जेथे आहे तुळशीचे पान तेथे वसे नारायण, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल… महाराष्ट्रावर आलेली संकट दुर होऊन चांगले दिवस येऊदे यासाठी भाव भक्तीने देवाकडे साकडे घातले. तहान भुक विसरून वारकर्यांन सोबत हरिनाम जप केला. वारी’ हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला साठवीत साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्मत्त वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. जय हरी माऊली”, असे त्यांनी याला कॅप्शन देताना म्हटले आहे.

“आयुष्यात पहिल्यांदाच…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितला वारीचा अनुभव

दरम्यान दिपाली सय्यद यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या या पोस्टवरुन त्यांना ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे. आमचा विठ्ठल नका घेऊ डोक्यावर, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. काय पावडर, काय मेकअप, काय लिपस्टिक. Ok मध्ये …..आणि वारकरी म्हणे, असे एकाने कमेंट करताना म्हटले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.